Zoho Success Story: 80 देशांमध्ये ऑफिसेस, 15 हजार कर्मचारी, Sridhar Vembu यांच्या झोहोची स्टोरी काय?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-10-09
Просмотров: 94745
#BolBhidu #Zoho #SridharVembu
एक भारतीय कंपनी. टोटल रेव्हेन्यू आठ हजार सातशे कोटी. ओला, लेन्सकार्ट, फोनपे यांसारख्या कंपनींपेक्षा कितीतरी जास्त. कंपनीचा फाउंडर एका खेड्यात राहतो. लुंगी घालतो, सायकलवर फिरतो. कंपनीची स्थापना होऊन २९ वर्ष झाले. पण तिनं आजपर्यंत एकाही इन्व्हेस्टर कडून एका रुपयाचंही फंडिंग घेतलेलं नाही. बिझनेस मॉडेल असं, की फंडिग घेण्याची गरजच नाही. आज या कंपनीचं व्हॅल्यूएशन ५० हजार कोटींपेक्षा जास्त आहे, तिचे ८० देशांमध्ये ऑफिसेस आहेत, १५ हजार पेक्षा जास्त कर्मचारी आहेत.
फक्त महिनाभरापूर्वी तीचं नाव फारसं कोणी ऐकलं नव्हतं, कारण या कंपनीचा जाहिरात करण्यावर विश्वास नाही. पण आज ही कंपनी मायक्रोसॉफ्ट, गुगल सारख्या कंपन्यांना टक्कर देतीये, तिचे प्रॉडक्ट्स व्हॉट्सअपचा पर्याय म्हणून समोर येतायेत. सरकारचे मंत्री स्वत: हून तिची जाहिरात करतायेत. पण हे सगळं घडलं कसं? भारताच्या खेड्यांमधून ऑपरेट होणारी कंपनी एवढी मोठी कशी झाली? तिला जाहिरातींची गरज का नाही? ही सक्सेस स्टोरी आहे या भारतीय कंपनीची, तिच्या उदयाची, तिच्या बिझनेस मॉडेलची, खेड्यात राहणाऱ्या माणसानं उभारलेल्या कोट्यवधी रुपयांच्या साम्राज्याची. ही स्टोरी आहे झोहोची.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: