लोकमान्य टिळक जन्मस्थान रत्नागिरी आणि लांजातल्या आमच्या घराजवळचा परिसर.
Автор: Ruchira and Abhishek
Загружено: 2025-12-12
Просмотров: 15519
मंडळी नोव्हेंबर महिन्यामध्ये गावच्या जत्रेसाठी आम्ही आमच्या कोकणातल्या गावी आलो. जत्रा झाल्यानंतर आता वेळ होती ती पर्यटनाची. रुचिराचे आई-वडील सुद्धा सोबत असल्यामुळे आम्ही रत्नागिरीला जायचे ठरवलं. रत्नागिरीला रुचिराची चुलत बहीण राहते, त्यांनी आम्हाला जेवायला बोलावलं होतं. या व्हिडिओत सुरुवातीला आपण आमच्या गावच्या घराच्या आसपासचा परिसर पाहणार आहोत आणि थोडक्यातच लांजा ते रत्नागिरी हा प्रवास पाहणार आहोत. त्याचसोबत व्हिडिओच्या उत्तरार्धात आपण रत्नागिरी मधले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे जन्मस्थान सुद्धा पाहणार आहोत. लोकमान्य टिळकांचा जन्म ज्या वास्तूमध्ये झालात त्याचे आता संग्रहालय बनवण्यात आले आहे आणि परिसराचे सुंदर सुशोभीकरण करण्यात आले आहे. इतकी वर्ष रत्नागिरीत येऊन सुद्धा मी पहिल्यांदाच या ठिकाणाला भेट दिली आणि इथे येऊन थक्क झालो.
हे सर्व तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळेल, म्हणून ही व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपले अभिप्राय खाली कमेंट करायला संकोच करू नका.
धन्यवाद.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: