सोप्या सुरळया | आता सुरळीच्या वड्या सहज करा | Suralichi Vadi | Khandvi | सराईत सुरळया | Easy Snacks
Автор: Sugran Seema
Загружено: 2024-03-23
Просмотров: 92085
साहित्य:
पाऊण वाटी. बेसन
पाऊण वाटी ताक
पाऊण वाटी. पाणी
पाव चमचा. हींग
अर्धा चमचा. हळद
अर्धा चमचा. मीठ
पाव चमचा. राई
पाव चमचा. जिरं
दोन चमचे. ओलं खोबरं कीस
दोन चमचे. कोथिंबीर
दोन चमचे तेल
कृती:
प्रथम एका भांड्यात बेसन, हींग,हळद, मीठ ताक, पाणी सगळं एकत्र करून छान ढवळून बेसनाच्या सगळ्या गुठळ्या मोडून काढा. गॅसवर मोठ्या तोंडाच्या भांड्यात पाणी उकळत ठेवा. त्यात एक स्टॅण्ड ठेवून वर झाकण ठेवा. एका ताटलीला तेल लावून ती ताटली स्टॅण्डवर ठेवा.आणि ताटलीत १ पळी पीठ घालून २,३मिनिटं झाकून ठेवा.गॅस मध्यम ठेवा. नंतर झाकण काढून ताटली बाहेर काढून २ मिनिटं थंड करा. नंतर सुरीने लांब तुकडे पाडून त्याच्या सुरळया करा.
सगळ्या पीठाच्या सुरळया झाल्यावर वरुन राई,जिरयाची फोडणी द्या. वरून कोथिंबीर आणि ओल्या खोबऱ्याचा कीस घाला. आणि सोप्या सुरळया सर्व्ह करा.
#सोप्पी #सुरळया #रूचकर #पारंपारीक #सोप्या #tasty #suralichiwadi #suralya #wadi #besan #easyrecipe
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: