Sugran Seema

नमस्कार मंडळी,
मी सीमा पाटील , सुगरण सीमा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करते .
मंडळी, आपण चवीनं खाणारी माणसं . म्हणुन बांद्यापासून चांद्यापर्यंत पसरलेल्या
महाराष्टाच्या विविध प्रदेशातील मराठी पदार्थाची या चॅनेल मध्ये
मी आपणास ओळख करून देणार आहे . त्यात कोंकणी पदार्थ,
खानदेशी पदार्थ , मराठवाडी पदार्थ , विदर्भातील पदार्थ ,
रायगडचे पदार्थ , आगरी पदार्थ , वसईपरिसरातील वाडवळ पदार्थ
तसेच महाराष्ट्रातील अठरापगड समाजातील निवडक शाकाहारी पदार्थांची ओळख
करून देण्याचा प्रयत्न करणार आहे .
त्यात फराळ, न्याहारी, जेवण तसेच दिवाळी, गौरी-गणपती
व इतर सांस्कृतिक सणासुदीला केल्या जाणाऱ्या पदार्थांचा समावेश असेल.
त्यासाठी घरात सहज उपलब्ध असणारे घटक पदार्थ आणि सामग्रीचा वापर केला जाणार आहे.
आपणास करता येतील अश्या सोप्या पद्धतीने त्या सादर केल्या जातील .
तर मग वाट कसली बघता , हा चॅनल SUBSCRIBE करा आणि
चवदार मराठी पदार्थाचा आस्वाद घ्या. लाइक करून मित्रमंडळीमध्ये SHARE करा.