फलटण शहराच्या हद्दवाढीचा निर्धार! जाधववाडी–ठाकूरकी–फरांदवाडीच्या विकासाला गती : रणजितदादा
Автор: Sthairya
Загружено: 2025-12-29
Просмотров: 9240
जाधववाडी येथे आयोजित जाहीर नागरी सत्कार सोहळ्यात मान्यवरांनी फलटणच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण शहराची हद्दवाढ करून कोळकी वगळत जाधववाडी, ठाकूरकी आणि फरांदवाडीचा समावेश करण्याचा निर्धार व्यक्त केला. या परिसरांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार सचिन पाटील यांनी फलटण शहरासह संपूर्ण तालुक्यात विकासकामांचा डोंगर उभा राहिल्याचे सांगत, हा विकास माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून शक्य झाल्याचे नमूद केले.
नवनिर्वाचित नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटणच्या सर्वांगीण विकासासोबतच उपनगर असलेल्या जाधववाडीच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत राहण्याची ग्वाही दिली.
हा जाहीर नागरी सत्कार सोहळा जाधववाडीचे युवा नेते व माजी सरपंच मुनीश जाधव यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात नूतन नगरसेवकांचाही सन्मान करण्यात आला.
अशाच स्थानिक, थेट आणि विश्वासार्ह अपडेट्ससाठी दैनिक स्थैर्य YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि आपले मत कमेंटमध्ये नोंदवा.
#स्थैर्य #फलटण #मराठीन्युज #हद्दवाढ #जाधववाडी #समशेरसिंहनिंबाळकर #विकास
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: