गिगाव फाटा येथे शेतकऱ्यांचा रस्ता रोको आंदोलन
Автор: BM NEWS Malegaon
Загружено: 2025-09-27
Просмотров: 388
गिगाव फाटा येथे शेतकऱ्यांचा रस्ता रोको आंदोलन यशस्वी
मालेगाव-चाळीसगाव राज्य महामार्गावरील गिगाव फाटा येथे शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या. त्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, कांद्याच्या दर घसरणीमुळे व वाहतुकीदरम्यान होणाऱ्या नुकसानासाठी भरपाई मिळावी, कपाशीला प्रती क्विंटल दहा हजार रुपये हमीभाव मिळावा, तसेच शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशा मागण्यांचा समावेश होता.
शेतकऱ्यांनी शासन व प्रशासनाला इशारा दिला की मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल.
या आंदोलनाचे नेतृत्व लोकशाही धडक मोर्चाचे नाशिक जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ जाधव यांनी केले. यावेळी हिरालाल नरवाडे, प्रदीप पोपटराव मोरे, कल्याण अण्णा जाधव, दिनकर काशिनाथ जाधव, परविन अहिरे, सखाराम देवरे, गोरख फकीरा सोनवणे, नामदेव पवार, प्रल्हाद सोनवणे, भाऊसाहेब जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आंदोलनाच्या वेळी माळमाथ्यातील शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: