बोरगावचे तिन्ही बाजूचे रस्ते-पूल पाण्याखाली. श्रीपूरमार्गे, बायपासनेच वाहतूक सुरू | Borgaon-Shreepur
Автор: The Daily Life
Загружено: 2025-09-27
Просмотров: 1561
#borgaon #shreepur #reels #thedailylife #rain
बोरगाव (ता. माळशिरस) गेल्या दोन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बोरगाव परिसरातील सर्व ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. माळेवाडी–बोरगाव, वेळापूर–बोरगाव आणि तोंडले–बोंडले–माळखांबी–बोरगाव या तिन्ही दिशेने येणाऱ्या रस्त्यांवरील पूल पाण्याखाली गेले आहेत.
विशेषतः विझोरी–खंडाळी आणि खंडाळीचे तळे–डी-19 या ओढ्याचे पाणी पूलावरून वाहू लागल्याने सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे बोरगावकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक प्रशासनाने या तीनही ठिकाणची वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने तात्पुरती बंद केली आहे.
तथापि, श्रीपूरच्या दिशेने व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील बायपास मार्गे बोरगावला जाणारी वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पावसाचा जोर आणखी वाढल्यास स्थिती गंभीर होऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
एकंदरीत माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातील परिस्थिती पाहिली असता, महाळुंग-श्रीपूर,बोरगाव ,उंबरे,नेवरे,जांभूड, कोंडरपट्टा,मिरे, माळखांबी,बोरगाव-माळेवाडी, परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. दोन दिवसापासून सूर्यदर्शन झाले नाही आणि माळशिरस तालुक्यातील हवामानाच्या अंदाजानुसार रात्री उशिरा वाऱ्यासह दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाऊस उघडल्यानंतर नागरिकांचे खरेदीसाठी धावपळ होताना बाजारपेठांमध्ये दिसत आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: