श्रीभगवद्गीता आणि श्रीविष्णुसहस्रनाम पठणाचे अलौकिक लाभ - प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे
Автор: SADGURUBODH
Загружено: 2025-12-22
Просмотров: 7490
श्रीभगवद्गीता आणि श्रीविष्णुसहस्रनाम पठणाचे अलौकिक लाभ - प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे
प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे यांनी श्रीविष्णुसहस्रनाम आणि श्रीगीता पठण वर्गाच्या कार्यक्रमात रविवार दि.१४ डिसेंबर २०२५ रोजी 'श्रीपाद-निवास', पुणे येथे केलेला मार्मिक आणि रहस्योद्घाटक बोध !!
भारतीय तत्त्वज्ञानाचे सार असणारी श्रीगीता आणि श्रीविष्णुसहस्रनाम या जोडगोळीने येणाऱ्या दोन्ही अद्भुत रचनांच्या पठणाचे स्वतंत्र महत्त्व आहे. गीता पापनाश करून शुद्ध पुण्य देते, तिच्या मनन-चिंतनाने तत्त्वज्ञानाची एक बैठक तयार होते. पुढे या पुण्यापासून परमार्थाची बुद्धी होऊन सद्गुरुकृपेने नाम मिळते. म्हणून गीता आणि सहस्रनाम ही जोडगोळी आहे, असे प.पू श्री.दादा सांगतात.
श्रीमद् भगवद्गीतेचे माहात्म्य आणि अलौकिक लाभ सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींनी दोन अप्रतिम ओव्यांमधून सांगितला आहे. त्या ओव्यांचे सुरेख विवरण प.पू.श्री.दादांनी येथे केले आहे. सप्तशती गीता, मोह, अहंता, ममता आदी संज्ञांचे अप्रतिम आणि अभिनव विवेचन या निमित्ताने पहिल्यांदाच आपल्यासमोर येत आहे. त्यामुळे समस्त साधकांनी, गीताप्रेमी सज्जनांनी प्रस्तुत व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक समजून घेणे अगत्याचे आहे !!
#bhaktimarg #sadhana #shireeshdadakawade #शिरीषदादाकवडे #dnyaneshwari #गीता #gita #गीता_उपदेश #गीताज्ञान #माउली # #विष्णुसहस्रनाम
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: