हे कर्मभोग माझ्याच वाट्याला का ? 'कर्मसिद्धांता'चे इतके सुंदर विवेचन तुम्ही कधीच ऐकले नसेल !
Автор: SADGURUBODH
Загружено: 2025-12-10
Просмотров: 17132
हे कर्मभोग माझ्याच वाट्याला का ?
'कर्मसिद्धांता'चे इतके सुंदर विवेचन तुम्ही कधीच ऐकले नसेल !
'कर्मसिद्धांत' हा आपल्या भारतीय तत्त्वपरंपरेतील अत्यंत मोलाचा आणि विशेष महत्त्वाचा सिद्धांत आहे. आजवर या विषयावर अनेकांनी अनेक प्रकारे विवरण केलेले पाहायला मिळते. प्रस्तुत व्हिडिओमध्ये संतवाङ्मयाचे गाढे अभ्यासक आणि श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे यांनी अतिशय सोप्या भाषेत, सर्वांना समजेल-उमजेल अशा अनोख्या पद्धतीने हा गहन विषय फारच छान समजावून सांगितला आहे. 'कर्मसिद्धांता'चे इतके सुंदर विवेचन तुम्ही आजवर कधीच ऐकले नसेल !
कर्मसिद्धांत, कर्माचे कारण; कर्मभोग आपल्या वाट्याला का येतात ? कर्मभोग कोणाला समजतात ? कर्मांची अदलाबदल कोणाला करता येते ? ज्योतिषशास्त्राचे मूलभूत नियम, नऊ ग्रहांचे कार्य, काळाची संकल्पना आणि ग्रहांची परिभाषा; जन्मपत्रिका म्हणजे काय ? प्रत्येक वस्तूचे तीन प्रकारचे अस्तित्व; नियती, प्रारब्ध, संचित; महात्मा आणि सामान्य माणूस प्रारब्धभोग कसे भोगतो ? कर्मांची बेरीज वजाबाकी कशी होते ? सुख-दुःखांचा दाता कोण ? दरवेळी आपले कर्मभोग टाळण्यासाठी श्रीसद्गुरूंना गळ घालणे कितपत योग्य आहे ? न सांगताच सर्व काही जाणणारे सद्गुरु स्वतःहूनच शिष्यांचे कर्मभोग कसे बदलतात, त्यांना सर्व बाजूंनी कसे सांभाळतात ? इत्यादी अनेक महत्त्वपूर्ण विषयांचे सखोल, सविस्तर आणि सहजसोपे असे हे मौलिक विवेचन सर्वच साधक-सज्जनांनी पुनःपुन्हा जरूर ऐकावे आणि समजून घ्यावे ही विनंती !
श्रीदत्तधाम, वर्धा येथे दि.१७-१८ नोव्हेंबर २०२५ दरम्यान संपन्न झालेल्या भगवान श्री ज्ञानेश्वर माउली संजीवन समाधी महोत्सव शिबिरातील शंका
समाधान सत्रातील प्रश्नोत्तर.
#shireeshdadakawade #शिरीषदादाकवडे #bhaktimarg #sadhana #mahayog #दत्तसंप्रदाय #dnyaneshwari #naam #श्रीदत्त #कर्म #karmasiddhant #कर्मसिद्धांत #कर्मफल #karmafal #प्रारब्ध #नियती #niyati
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: