“रन फॉर युनिटी” उपक्रमातून मालेगावात
Автор: BM NEWS Malegaon
Загружено: 2025-11-04
Просмотров: 251
🏃♂️ “रन फॉर युनिटी” उपक्रमातून मालेगावात
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त एकतेचा संदेश ✨
मालेगाव, दि. ३१ ऑक्टोबर –
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त “रन फॉर युनिटी... एक दौड देश की, एकता और अखंडता के लिये” या भव्य उपक्रमाचे आयोजन मालेगाव शहरात करण्यात आले.
या उपक्रमाचे आयोजन कॅम्प पोलीस स्टेशन व छावणी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
हा उपक्रम नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच
श्री. तेजबीरसिंह संधू (अप्पर पोलीस अधीक्षक, मालेगाव),
श्री. सिद्धार्थ बारवाल (उपविभागीय पोलीस अधिकारी, मालेगाव शहर),
श्री. दर्शन दुगड (उपविभागीय पोलीस अधिकारी, मालेगाव कॅम्प),
श्री. दीपक जाधव (पोलीस निरीक्षक, छावणी पोलीस स्टेशन),
श्री. दीपक पाटील (सहाय्यक पोलीस निरीक्षक, कॅम्प पोलीस स्टेशन),
पो. उपनिरीक्षक विजया पवार आणि सुनीता कोळपकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
या उपक्रमात पोलीस हवालदार रुपचंद पारधी दादा, हितेश भामरे, लखन पवार, हर्षल पवार, कैलास सोनवणे यांनी महत्वपूर्ण सहकार्य केले.
“रन फॉर युनिटी” मध्ये एम.एस.जी. कॉलेजचे प्रा. सुभाष निकम, तसेच संकल्प अकॅडमी, वीर भगतसिंग अकॅडमी, सूर्यदीप अकॅडमी, प्रहार अकॅडमी, इच्छापूर्ती अकॅडमी यांच्या विद्यार्थ्यांनी, संचालक मंडळाने व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
तसेच रोटरी क्लब ऑफ मालेगाव व्हिजनचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर सोनवणे, सचिव रो. विजय डोखे,
रो. दीपक शेलार, रो. शेखर सोनवणे, रो. विनोद शेलार, रो. डॉ. ऋषिकेश पाटील, रो. नंदकिशोर मोरे, रो. डॉ. सुरेखा दप्तरे, रो. तेजस शेलार उपस्थित होते.
आदर्श शिक्षक भिमराव मगरे, बिपीन पटाईत, शैलेंद्र सोनवणे व सामाजिक कार्यकर्ते सुशील कांबळे यांनीही या दौडीत सहभाग घेतला.
इंटरनॅशनल धावपटू वैशाली शेलार, सोनाली शेलार, रुपाली शेलार आणि चित्रा साळवे यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.
कार्यक्रमानंतर रोटरी क्लब ऑफ मालेगाव व्हिजनतर्फे सर्व सहभागींसाठी अल्पोहाराचे आयोजन करण्यात आले.
हा दौड उपक्रम ६० फुटी रोड, अहिंसा सर्कल, मौसम पूल, एकात्मता चौक, बी पोलीस कवायत मैदान, एम.एस.जी. कॉलेज मैदान मार्गे पार पडला.
हजारो तरुण, महिला आणि नागरिकांच्या सहभागामुळे शहरात एकतेचा आणि देशभक्तीचा जयघोष घुमला. 🇮🇳
📸 वृत्तसंकलन व अहवाल:
महेशकुमार मोरे (बबलुभाऊ मोरे)
संस्थापक संपादक – BM NEWS Malegaon
📞 9860313938 | 🌐 wa.me/919860313938
🎥 सहकार्य: पत्रकार रविंद्र जी. ढोडरे (उपसंपादक – BM NEWS Malegaon)
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: