औचित्याच्या मुद्याव्दारे शालेय पोषण आहार योजनेतील कामगारांच्या मानधनात भरीव वाढ करण्याची मागणी केली.
Автор: vijaysinh pandit
Загружено: 2025-07-03
Просмотров: 1145
शालेय पोषण आहार योजनेत मध्यान भोजन तयार करण्याचे काम अतिशय गरजु, विधवा, परितक्त्या महिला करत आहेत. त्यांना केवळ २५०० रुपये प्रतिमाह मानधन दिले जाते. सद्यस्थितीत हे मानधन अतिशय तोडके असुन या मानधनात त्यांचा उदरनिर्वाह भागविणे केवळ अशक्य आहे. शासनाने आहार कामगारांना प्रतिमाह १००० रुपये मानधन वाढीचा निर्णय दि. १ जुलै २०२४ च्या मंत्रीमंडळ बैठकीत केला. सुमारे वर्षभराचा कालावधी होवुनही अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नाही.
बीड जिल्ह्यात ८५०० आणि गेवराई तालुक्यात ६५० आहार कामगार या योजनेत कार्यरत आहेत. अधिवेशनापुर्वी त्यांनी या बाबतचे निवेदन देवुन सभागृहात त्यांच्या भावना पोहचविण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज औचित्याच्या मुद्याव्दारे हा विषय विधानसभेत मांडुन शालेय पोषण आहार योजनेतील कामगारांच्या मानधनात भरीव वाढ करण्याची मागणी केली.
#MonsoonSession
#maharashtra
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: