मकरसंक्रांत स्पेशल मऊ आणि खुसखुशीत तीळाच्या वड्या/ Tilgulachi vadi/ Manisha queen Recipe 2026
Автор: Manisha queen 👑
Загружено: 2026-01-17
Просмотров: 58
तिळाची वडी रेसिपी.
साहित्य:
तीळ: १ वाटी (२०० ग्रॅम)
गूळ: १ वाटी (चिरलेला)
शेंगदाणे: १/४ वाटी (भाजलेले आणि जाडसर कूट केलेले)
तूप: १-२ चमचे
वेलची पूड: १/२ चमचा
पाणी: २ चमचे
कृती:
१. तीळ भाजणे: कढईमध्ये तीळ मंद आचेवर खमंग आणि हलके सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. एका ताटात काढून गार होऊ द्या.
२. पाक तयार करणे: कढईत तूप, चिरलेला गूळ आणि पाणी #२०२६ घालून मंद आचेवर गूळ वितळवा. गुळाला फेस येऊ लागला की पाकाची चाचणी करा. थंड पाण्यात पाकाचा थेंब टाकल्यावर त्याची कडक गोळी झाली की पाक तयार आहे.
३. मिश्रण एकत्र करणे: पाकात भाजलेले तीळ, शेंगदाणा कूट आणि वेलची पूड घालून झटपट हलवा.
४. वडी थापणे: तूप लावलेल्या पोळपाटावर किंवा ताटात हे मिश्रण काढून घ्या आणि लाटण्याने समप्रमाणात थापून घ्या.
५. वड्या पाडणे: मिश्रण गरम असतानाच सुरीने वड्या कापून घ्या. अर्धा तास सेट होण्यासाठी ठेवा.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: