पुणे शहराच्या पाणीप्रश्नावर मुख्यमंत्र्याबरोबर लवकरच बैठक!
Автор: Satej Patil (Bunty D. Patil)
Загружено: 2025-12-18
Просмотров: 76
पुणे शहराच्या पाणीप्रश्नावर मुख्यमंत्र्याबरोबर लवकरच बैठक!
आज पुणे शहराच्या पाणीपुरवठा संदर्भातील लक्षवेधी सुरु असलेल्या प्रश्नामध्ये सहभागी होऊन पुणेकरांच्या अडचणी मांडल्या.
पुणे शहराचा विस्तार वाढत असताना महानगरपालिकेने सन 2025- 26 साठी 16.32 टीएमसी पाण्याची मागणी नाकारून पाटबंधारे विभागाने केवळ 14.66 टीएमसी पाणी आरक्षित केले आहे त्यामागचे कारण काय? पुण्यात सध्या 1 लाख टँकर्सने पाणी पुरवठा केला असून टँकर टोळ्यांचा उद्रेक झाला आहे. सरकार जर पाणी देणार नसेल तर बांधकाम परवानग्या का देत आहे ? या संदर्भात मुख्यमंत्री स्तरावर बैठक घेऊन योग्य मार्ग काढावा नाहीतर पाण्यावरून पुण्यात अराजकता वाढेल असे सरकारला सुचवले.
यावर जलसंपदा मंत्री मा. राधाकृष्ण विखे- पाटील यांनी पुण्याच्या वाढत्या पाणी प्रश्नावर सर्वसमावेशक असा विचार करून नक्कीच तोडगा काढू असे आश्वासन दिले.
मंगळवार, 9 डिसेंबर 2025 स्थळ- विधीमंडळ, नागपूर
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: