कोल्हापूर- सांगली- सातारा GCC साठी लवकरच लोकप्रतिनिधींची विस्तारित बैठक!
Автор: Satej Patil (Bunty D. Patil)
Загружено: 2025-12-12
Просмотров: 105
सध्या देशातील इतर राज्ये Global Capacity Centre (GCC) संदर्भात धोरण आखत आहेत. सर्वात जास्त GCC असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्य आहे. नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या जिल्ह्यांचा नेहमी यासाठी उल्लेख होतो. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा आणि कोल्हापूर हे भौगोलिक दृष्ट्या एकत्र आणि आर्थिक दृष्ट्या महत्वाचे असलेल्या जिल्ह्यांत औद्योगिक कॅरिडॉर विकसित होऊ शकतो.
या तिन्ही जिल्ह्यांची औद्योगिक क्षमता मोठी असून उद्योग, आयटीसाठी लागणारे मनुष्यबळ, कृषी उत्पादने, कृषी प्रक्रिया उद्योग दळणवळणाच्या सोई, यासगळ्यांमुळे GCC साठी पोषक वातावरण आहे. राज्याच्या तिजोरीत अधिक महसुल देणारी ही जिल्हे असल्याने GCC संदर्भात धोरण ठरवत असताना या तीन जिल्ह्यांचा विचार करावा असे सरकारला सुचवले.
यावर उत्तर देताना राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी तिन्ही जिल्ह्यांचं महत्व अधोरेखित करताना GCC बरोबरच आयटी पार्क संदर्भात राज्य शासन सकारात्मक आहे. लवकरच या तिन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची एक विस्तारित बैठक घेऊन त्यावर निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: