Jaykumar Gore | भाजपच्या गुंडांनी संतोष देशमुख स्टाईलमध्ये जीव घेतला, पोलीस तपास करेनात | Part 1
Автор: Lay Bhari News
Загружено: 2025-11-04
Просмотров: 97584
#jaykumargore #devendrafadanvis #GhanshyamSonavane #laybharinews #tusharkharat #drsampadamunde
बीडमध्ये संतोष देशमुख यांचा जीव घेण्यात आला होता. आठ दहा गुंडांच्या जमावाने संतोष देशमुख यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली होती. या गुंडाच्या टोळक्याने दयामाया न दाखवता संतोष देशमुख यांना जीव जाईपर्यंत मारहाण केले होती. या निर्लज्ज टोळक्याने मारहाणीचे चित्रीकरण सुद्धा केले होते. या भयानक घटनेची आठवण होण्यासारखी अत्यंत खळबळजनक घटना सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात घडलेली आहे. नातेपुते वरून सांगलीला टेम्पो घेऊन जाणाऱ्या एका निष्पाप व्यक्तीचा बळी बारा जणांच्या टोळक्याने घेतला आहे. या बारा जणांपैकी बहुतांश भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्या निष्पाप व्यक्ती विषयी दयामाया न दाखवता लोखंडी रॉडने, लाथा बुक्क्यांनी, दगडांनी या निष्पाप व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. या निष्पाप व्यक्तीला मारहाण केल्यानंतर या निर्दयी मारेकऱ्यांनी मोबाईलवर शूटिंग केले. ते व्हिडिओ मृत व्यक्तीच्या मतलगांना पाठवले. या भयानक हत्याकांडाचा गुन्हा दाखल करण्यास वडूज पोलीस ठाण्याचे पीआय घनश्याम सोनवणे यांनी सुरुवातीला टाळाटाळ केली. पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर हे वडूज पोलीस ठाण्यात पोचल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. परंतु मारहाणीचे व्हिडिओ पोलिसांनी न्यायालयात सादर केले नाहीत. त्यामुळे नऊ आरोपी लगेचच जामीनावर बाहेर आले. तीन आरोपी अजून फरार आहेत. मृत संजय कर्चे यांची मुलगी सोनाली कर्चे यांनी सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण पुकारले. त्यावर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी अरुण देवकर या पोलिस अधिकाऱ्याकडे तपास सोपवला. तीन महिने झाले तरी अरुण देवकरने एकाही आरोपीला अटक केलेली नाही. दुर्दैवी योगायोग म्हणजे घनश्याम सोनवणे आणि अरुण देवकर हे दोन्ही अधिकारी मंत्री जयकुमार गोरे यांच्या खास मर्जीतील आहेत, असा आरोप सोनाली कर्चे यांनी 'लय भारी'ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. जयकुमार गोरे यांनी आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांची या तपासात नियुक्ती करून तपास दडपल्याचा आरोप कर्चे यांनी केला आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: