वाशिमचा कायापालट करणार, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार; मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही | CM Devendra
Автор: Saam TV News
Загружено: 2025-11-28
Просмотров: 2136
वाशिम येथील जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेत शहराच्या विकासाचा आराखडा मांडला. 'विरोधक अफवा पसरवत आहेत, पण जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही,' असे त्यांनी ठामपणे सांगितले. वाशिममधील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाचे काम येत्या ४-६ महिन्यात सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, वाशिम, कारंजा आणि रिसोडच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे निधीची कमतरता नसल्याचे सांगत, त्यांनी भाजप उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. 'आम्ही केवळ भाषणे करत नाही, तर दिलेली आश्वासने पूर्ण करतो,' असे म्हणत त्यांनी मतदारांना भाजपच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.
#DevendraFadnavis #CMFadnavis #Washim #LadkiBahinYojana #BJP #MaharashtraPolitics #SaamTV #Mahayuti #WashimElection #NadiJodPrakalp #LakhpatiDidi #MarathiNews #Devabhau #Maharashtra #Election2025
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: