Dnyaneshwari Adh 18P3 Shlok58-78Ovi1269-1811( ज्ञानेश्वरी अध्याय १८ श्लोक ५८ ते ७८ ओवी १२६९ ते १८११)
Автор: बुद्धितरंग, आनंद अस्तित्वाचा Joy Of Existence
Загружено: 2021-07-18
Просмотров: 56006
Shrimad Bhagvadgita Shlokarthasah Granthraj Shri Dnyaneshwari (Bhavarthdipika) Sampurn Parayan Adhyay 18 Part 3 Shlok 58-78 Ovi 1269-1811
{श्रीमद भगवद्गीता श्लोक अर्थासह ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका) सम्पूर्ण परायण अध्याय १८ भाग ३ श्लोक ५८ ते ७८ ओवी १२६९ ते १८११}
नमस्कार.
मानव संपूर्ण जीवनभर सुखी होण्यासाठी अखंडपणे अविश्रांत प्रयत्नशील असतो. व त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून तो स्वतःच्या भोवताली कितीतरी भौतिक साधनांचा अक्षरशः ढिग उभा करतो.
तरी सुद्धा बहुतेक वेळा त्याच्या जीवनात त्याला तृप्तीची अनुभूती येत नाही आणि मग अनेकदा त्याचा प्रवास नैराश्याच्या भोवऱ्या कडे सुरू होतो, ज्यात अडकल्यावर बाहेर येणे खूप अवघड होऊन बसते.
भौतिक साधनांमध्ये मानवाला तृप्तीची अनुभूती येत नाही कारण,
आनंदी जीवन जगण्याची कला त्याने महाकष्टाने मिळवलेल्या भौतिक साधनांमध्ये नसून त्याच्या आत्मिक ज्ञानामध्ये असते
मग आता प्रश्न हा उपस्थित होतो कि, आनंदी जीवन जगण्यासाठी अनिवार्यपणे लागणारे हे आत्मिक ज्ञान मिळवायचे कसे ?
तर त्याचे उत्तर संत शिरोमणी ज्ञानेश्वर माउलींच्याच शब्दात द्यायचं झाल तर, माउली ज्ञानेश्वरीच्या चवथ्या अध्यायात म्हणतात
ते ज्ञान पै गा बरवे | जरी मनी आथी आणावे |
तरी संता यां भजावे | सर्वस्वेसी |
आनंदी जीवन जगण्यासाठी संत विचारांची गरज अनिवार्य आहे. परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनात संत विचार जाणून घेण्यासाठी वेळ मिळणे कठीनप्राय होऊन बसले आहे.
आणि म्हणूनच यावर उपाय म्हणून आजच्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संत शिरोमणी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माउली ज्ञानेश्वर महाराजांची खऱ्या अर्थाने मानवी जीवन आनंदि व समृद्ध करणारी श्रीमद भगवद्गीते वरील अप्रतिम अशी साहित्यकृती ‘श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी’ चे संपूर्ण पारायण युट्युब च्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहोत.
सदर पारायण आपण प्रवासात असताना, चालताना, फिरताना व इतर शक्य असेल त्यावेळी श्रवण करू शकता.
या पारायणाचे वैशिष्ट हे आहे कि यात श्रीमद्भगवद्गीतेच्या श्लोकांचा मराठी अर्थ देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे.
हे संपूर्ण पारायण ऐकण्यासाठी व येणाऱ्या पुढील सर्व अध्यायांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी कृपया युट्युब वरील बुद्धि तरंग हे चैनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. तसेच सदर पारायण कृपया आपल्या प्रियजनांना सुद्धा शेअर करा.
सुरवातीला कदाचित ग्रंथ समजायला अवघड जाईल परंतु नियमित श्रवणाने ग्रंथाचे चांगले आकलन होते हा अनेकांचा अनुभव आहे.
तरी, संत शिरोमणी माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या ह्या अप्रतिम अशा वांग्मय स्वरूप अमृतधारेचा शक्य तितका जास्तीत जास्त रसास्वाद घेऊन वैचारिक स्तरावर जीवन समृद्ध बनवावे तसेच मानसिक आरोग्य सुदृढ करावे ही नम्र विनंती.
राम कृष्ण हरी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: