AMC Election Anaysis | मुख्यमंत्र्यांनी विखेंना भरविलेला पेढा, हा फक्त विजयोत्सवाचा नव्हता; तर...
Автор: Ahilyanagarlive24
Загружено: 2026-01-17
Просмотров: 20229
नगरमध्ये दक्षिण व उत्तर, हे प्रशासकीय सोयीचे दोन विभाग. या दोन्ही विभागांत गेली दोन-तीन दशकं, शरद पवारांनी वर्चस्व गाजवलं. नाही म्हणायला, उत्तरेत विखे, हे पवारांना कायम पुरुन उरले. दक्षिणेत पवारांना रोखायला, तेवढा तगडा नेता तयार झाला नाही. त्याचं कारण होतं सहकार. विखे घराणं हे सहकारातील घराणं असल्यानं पवारांना त्यांना जास्त डॅमेज करता आलं नाही. उलट, विखेंनीच पवारांना उत्तरेत जास्त स्थिरावू दिलं नाही. गेल्या काही वर्षांपासून भाजपनं दक्षिणेतील राम शिंदेंना ताकद देण्याचा प्रयत्न केला. परंतु हा डाव जास्त यशस्वी झाला नाही. सभापती झालेल्या राम शिंदेंना कर्जत-जामखेड वगळता, दक्षिणेतील इतर तालुक्यांत म्हणावा तेवढा प्रभाव पाडता आला नाही. त्यामुळे गेल्या 10 वर्षांपासून भाजपनं व स्वतः विखेंनी, दक्षिणेत लक्ष घालण्यास सुरुवात केली. 2019 मध्ये भाजपनं दक्षिणेची खासदारकी जिंकली. दक्षिणेतील सहापैकी, तीन विधानसभाही जिंकल्या. परंतु एवढ्यावरच थांबता येणार नव्हतं.
गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर
बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : ahilyanagarlive24@gmail.com
अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com
#Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: