नाही रे मी नाही रे | दत्त प्रेमलहरी पद २२५० | पंत महाराज भजन २२५० | datta premlahari pad 2250
Автор: Bhausaheb Daddikar
Загружено: 2022-06-15
Просмотров: 4430
नाही रे मी नाही रे ।। दत्त सर्वांठायीं रे ।। धृ० ।।
सत्यज्ञानानंत विश्र्व ।। खेळतें प्रेमडोहीं रे ।। १ ।।
सहजचि येणें सहजचि जाणें ।। सहजचि निमणें ठायीं रे ।। २ ।।
एकानेक स्वरूपें व्यापक ।। भरलें दिशा दाही रे ।। ३ ।।
"मीच देह आहे, मीच कर्ता भोक्ता आहे, मीच जीव आहे, तो परमात्मा माझ्याहून निराळा आहे, अशी ही जीवदशा नाही. आत्मा हाच दत्तात्रय गुरू आपल्या या देहांत व बाहेर दृश्य जगांत असा सर्व ठिकाणी ओतप्रोत भरलेला आहे ।।धृ.।। सत्यस्वरूप, ज्ञानस्वरूप व अनंत म्हणजे अमर्याद स्वरूप तर अशा ह्या तिन्ही लक्षणांनी युक्त असे हे जग ब्रह्मस्वरूपच आहे. जगांतील प्रत्येक वस्तु या तिन्ही लक्षणांनी युक्त अशी आहे. हे जग प्रेममय अशा आत्मस्वरूपरूपी डोहांतील एक प्रेम लहरीच आहे. ती त्यांत प्रेमानंदाने खेळते रे ! सारांश, हे जग स्वरूपाहून भिन्न नाही. हे जग सत्यज्ञानानंत स्वरूपच आहे. ।।१।। स्वाभाविकपणे किंवा नैसर्गिकरित्या जन्माला येणे सहज घडते. येथे कांही काळ राहून, सहजच मरण प्राप्त होते ! म्हणजे स्वस्वरूपाच्या ठिकाणी लय पावणे हे सर्व आपोआपच घडते. ।।२।। एकपणाविरहित एकटे एकच असे स्वरूप आहे, ते स्वरूप प्रेमानंद भोगण्यासाठी एकाचे अनंत नामरूपांनी नटून, या दाही दिशांना असे सर्वत्र व्यापक होऊन भरले आहे रे. ।।३।।
#दत्तभजन #पंतमहाराजभजन #पंतमहाराजबाळेकुंद्री #pantmaharajbalekundri #pantmaharajbhajan #पंतभजन #दत्तप्रेमलहरी #dattapremlahari #भजन #bhajan #आरती #arti #arati #भक्ति #bhakti #दत्तात्रेय #dattatraya #dattatreya #दत्त #datta #datt #भक्ती #pantsampraday #पंतसंप्रदाय #पंतसांप्रदाय #पंथमहाराज #panthmaharaj #अवधूत #अवधुत #avadhut #avdhoot
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: