No confidence motion on Nagradhyaksha नगराध्यक्षांवर किती दिवसात अविश्वास ठराव आणता येतो?
Автор: Dnyan Kirti
Загружено: 2025-12-23
Просмотров: 43457
#nagarparisad
#nagarpalika
#नगराध्यक्ष
#नगरपलिका
#noconfidencemotion
#election
#maharashtranews
#maharashtraelection
#nagarpalikaelection
#नगराध्यक्षअविश्वासठराव
#nagarpalikaact
महाराष्ट्रात एकूण 424 नगरपरिषदा आणि नगरपंचायती आहेत.. मात्र त्यापैकी 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीसाठी नुकतेच मतदान पार पडले आणि 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाले.. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक म्हणजे 117 ठिकाणी तर
शिवसेना शिंदे गटाने 53 ठिकाणी नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली.. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 37 ठिकाणी विजय मिळाला.. राज्यात सत्ताधारी असलेल्या महायुतीतील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी हे पक्ष अनेक शहरांमध्ये वेगवेगळे आणि एकमेकांच्या विरोधात लढले... असे असले तरी या तीन पक्षांनी मिळून तब्बल 207 जागी म्हणजे 70 टक्क्यांपेक्षा अधिक ठिकाणी विजय मिळवला.. विरोधी असलेल्या महाविकास आघाडीला नगराध्यक्षांच्या संख्येत एकत्रितरीत्या 50 जागा सुद्धा जिंकता आल्या नाहीत... महायुतीच्या विजयाची आणि महाविकास आघाडीच्या पराभवाची कारणे कोणती? याचे विश्लेषण करण्यात सध्या सर्व राजकीय विश्लेषक गुंतलेले आहेत... त्यांनी ते करावे... आपण मात्र एका वेगळ्या मुद्द्याचे विश्लेषण करूयात..
या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, नगराध्यक्ष पदाची निवडणूक थेट जनतेतून झालेली आहे ... यापूर्वी नगराध्यक्षांची निवड नगरसेवक करायचे... त्यामुळे ज्या पक्षाचे जास्त नगरसेवक, त्यांचा नगराध्यक्ष असायचा... आता मात्र नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून गेलेला असल्याने, अनेक नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष एका पक्षाचा आणि बहुतांश नगरसेवक मात्र दुसऱ्याच पक्षांचे असं चित्र निर्माण झालेलं आहे... त्यामुळे आता नगरसेवकांचे समर्थन नसलेला नगराध्यक्ष काम कसं करू शकणार? नगरपरिषदेत ठराव करण्यासाठी नगरसेवकांचे बहुमत लागत असते, ते कसे मिळवणार?... आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, नगरसेवक नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव आणू शकतात, अशी तरतूद आहे... म्हणजे नगरसेवकांना नगराध्यक्षाला पदावरून दूर करण्याचा अधिकार आहे.. या तरतुदीला अनुसरून जास्त संख्या असलेल्या विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी मिळून नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव आणला, तर तर नगराध्यक्षाची खुर्ची जाणार का? असे प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झालेले आहेत.. त्यामुळेच आज आपण चर्चा करूया की,
1. थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांवर किती दिवसात अविश्वास ठराव आणता येतो?
2. अविश्वास ठराव मांडण्यासाठी आणि संमत होण्यासाठी किती टक्के नगरसेवकांची आवश्यकता असते?
3. नगराध्यक्षांवरील अविश्वास ठरावाची नेमकी प्रक्रिया काय?
4. थेट जनतेतून निवडलेल्या नगराध्यक्षाला अविश्वास ठरावापासून काही कायदेशीर संरक्षण आहे का?... आणि
5. नगराध्यक्षाला इतर नगरसेवकांनी सहकार्य केले नाही तर, त्याला प्रभावी कामकाज करण्यासाठी काही कायदेशीर उपाययोजना आहेत का?
या सर्व प्रश्नांची चर्चा आपण करूया...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: