खुसखुशीत गोड शंकरपाळी | दिवाळी स्पेशल रेसिपी | Pushpa’s Khamang Kitchen"| Sweet Shankarpali Recipe
Автор: Pushpa's Khamang Kitchen
Загружено: 2025-10-06
Просмотров: 382
✨ पुष्पास खमंग किचन तर्फे आज घेऊन आलोय एकदम खुसखुशीत, गोड आणि घरगुती शंकरपाळी रेसिपी.
दिवाळीच्या फराळामध्ये शंकरपाळीचा खास मान असतो. खायला गोड, कुरकुरीत आणि टिकवायला सोपी अशी ही रेसिपी घरात उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून अगदी कमी वेळामध्ये बनवली जाते.
👉 ह्या शंकरपाळीचे वैशिष्ट्य म्हणजे ती अगदी सोप्या पद्धतीने घरी तयार करता येते, त्यासाठी लागणारे सामान घरात सहज मिळते.
👉 दिवाळीच्या फराळाशिवाय शंकरपाळी अपूर्णच वाटते.
👉 मुलं, मोठे, सगळ्यांची फेवरेट अशी ही गोड खुसखुशीत डिश आहे.
---
🍴 साहित्य (Ingredients)
१ मध्यम आकाराची वाटी दूध
१ मध्यम आकाराची वाटी साखर
¾ (पाऊण) वाटी तूप
चवीपुरते मीठ
लागेल तसा मैदा
तळण्यासाठी तेल
---
👩🍳 कृती (Method / Preparation)
1. एका पातेल्यात दूध, साखर आणि वितळलेले तूप घालून फक्त कोमट होईपर्यंत गरम करून घ्या. याला ढवळत साखर विरघळू पर्यंत हलवत राहायचं आहे (फार तापवायचे नाही.)
2. हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात लागेल तसा मैदा टाकून मिक्स करा.
3. एकदम घट्ट नाही आणि खूप पातळ नाही असा गोळा तयार करून घ्या.
4. गोळा थोडा मळून घ्या आणि पोळपाटावर जाडसर लाटून घ्या.
5. सुरीने चौकोनी तुकडे करून शंकरपाळीचे पीस तयार करा.
6. कढईत तेल गरम करून या शंकरपाळ्या सोनेरी रंगावर खमंग तळून घ्या.
👉 आणि अशी तयार होते खुसखुशीत गोड शंकरपाळी ✨
---
🔖 हॅशटॅग्स (Hashtags)
#शंकरपाळी
#खुसखुशीतशंकरपाळी
#दिवाळीफराळ
#गोडरेसिपी
#मराठीरेसिपी
#फराळरेसिपी
#घरगुतीशंकरपाळी
#कुरकुरीतशंकरपाळी
#सणासुदीचापाक
#पुष्पासखमंगकिचन
#गोडशंकरपाळी
#मराठीफराळ
#दिवाळीस्पेशल
#फराळाचेपदार्थ
#शंकरपाळीरेसिपी
#Shankarpali
#SweetShankarpali #CrispySnacks
#DiwaliSpecial
#IndianSnacks #HomemadeShankarpali #FestivalRecipes #TraditionalSnacks #SweetSnacks #CrispyShankarpali #PushpasKitchen
#DiwaliSweets #HomemadeSnacks
#IndianFood
#CrispyBites
music used :Chasing Dusk
courtesy V N Video editor
पुष्पांज खमंग किचन या चैनल ची खाली लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही आमचे इतर सर्व व्हिडिओ पाहू शकता
/ @pushpapol4946
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: