स्वराज्यरक्षक धर्मवीर श्री छत्रपती संभाजीराजे शौर्यस्थळ धर्मवीरगड | Dharmaveer | Sambhaji Maharaj
Автор: भटकंती सह्याद्री समूह
Загружено: 2025-03-16
Просмотров: 317
बहादुरगड हे या किल्ल्याचे प्रचलित नाव असले तरी ते अधिकृत नव्हते. किल्ल्याचे कागदोपत्री नाव पांडे पेडगावचा भुईकोट किल्ला आहे. गॅझेट मध्येही अशीच नोंद आहे. २५ मे २००८ ला या गडाचे धर्मवीरगड असे नामांतर केले आहे. हा भूईकोट किल्ला अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात आहे.
पेडगावचा भूईकोट किल्ला देवगिरीच्या यादवांच्या काळात अस्तित्वात होती. किल्ल्यातील शिवमंदिर त्याची साक्ष देत आजही उभी आहेत. यादवांकडून किल्ला निजामशाहाच्या ताब्यात गेला. निजामशाहीचा पाडाव झाल्यावर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात होता. मोगलांचा सरदार बहादूरशहा कोकलताश हा औरंगजेबाचा दुध भाऊ होता. दक्षिणेचा सुभेदार असतांना त्याचा तळ पेडगावला होता. त्याने पेडगावच्या किल्ल्याची डागडूजी करुन या किल्ल्याचे नाव बहादूरगड ठेवले.
छत्रपती संभाजी राजांना संगमेश्वरला पकडल्यानंतर औरंगजेबाने आपली स्वतःची अकलूजला असलेली छावणी पेडगावला आणली. त्यानंतर याच गडावरून त्यांची उंटावर बसून विदुषकी टोप्या घालून अचकट विचकट वाद्ये वाजवीत धिंड काढली गेली. त्यानंतर त्यांना औरंगजेबासमोर हजर करण्यात आले. राजांसह अटकेत असलेल्या कवी कलश यांना राजांनी काव्य करण्यास सुचवले त्यांनी या प्रसंगी खालील काव्य रचले .
यावन रावण की सभा संभू बंध्यो बजरंग |
लहू लसत सिंदूरसम खूब खेल्यो रणरंग ||
जो रवी छवी देखतही होत बदरंग |
त्यो तव तेज निहारके तखत त्येजो अवरंग ||
औरंगजेबाने छत्रपती संभाजी राज्यांना खजिना व किल्ले ताब्यात देण्यास सांगितले त्यांनी त्यास नकार दिला, त्यानंतर मात्र राजांना स्वराज्य हवाली करण्यास सांगितले त्यालाही स्पष्ट शब्दात नकार दिला व ते स्वराज्य धर्मासाठी धर्मवीर झाले. राजांची करारी भेदक नजर बादशाहाला सहन होत नव्हती. त्याने त्यांचे डोळे काढण्याचे सुलतानी फर्मान सोडले. सर्व शिक्षा मात्र अगोदर कवी कलश यांच्यावर केल्या जात होत्या. नंतर त्या राजांना दिल्या जात होत्या. त्यानंतर दोघांचीही जीभ छाटण्यात आली. नंतर त्यांना पेडगावहून हलवून भीमा - इंद्रायणीच्या संगमावरील {तुळापुर} वढूला नेउन त्या दोघांचीही गुढीपाडव्याचा दिवस मुद्दाम पाहून त्याच्या आदल्या दिवशी निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांचा देहाची विटंबना करून त्यांचे अवशेष इतस्ततः टाकण्यात आले. परिसरातील लोकांनी वढू बु।। येथे त्या दोघांचाही अंत्यविधी केला. आजही तिथे धर्मवीर संभाजी राजांची समाधी धर्मासाठी केलेल्या बलिदानाची साक्ष देत उभी आहे.
___________________________________________
आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या नातेवाईक व मित्र परिवाराला सुद्धा सबस्क्राइब करायला सांगा.
माहिती आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा.
Please Like Share and Subscribe Channel
#भटकंतीसह्याद्रीसमूह
@Bhatkanti_Sahyadri_Samuh
#Bhatkanti_Sahyadri_Samuh
!!धन्यवाद!!
__________________________________________
महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे "भ्रमण महाराष्ट्राचे" हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा.
/ @bhraman_maharashtrache
#भ्रमण_महाराष्ट्राचे @Bhraman_Maharashtrache
___________________________________________
Shoot by:-
DJI OSMO Action3
--------------------------------------------------------------------
इंस्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
/ bhatkantisahyadrisamuh
/ nskharate
__________________________________________
Please Like Share and Subscribe Channel
Thank You 🙏
-------------------------------------------------------------------
#dharmaveer #chhatrapati #swarajya #sambhajiraje #छत्रपती #maharashtra #sambhajimaharaj #chhava
*******************************************
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: