कळंब नगराध्यक्षा पदासाठी 10 तर नगरसेवक पदासाठी 129 अर्ज दाखल
Автор: M D Live Marathi
Загружено: 2025-11-16
Просмотров: 3919
#mdlivemarathi #dharashiv #धाराशिव नगराध्यक्षा पदासाठी 10 तर नगरसेवक पदासाठी 129 अर्ज दाखल
कळंब नगर पालिका निवडणुकीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून , रविवारपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी 10 तर नगरसेवक पदासाठी तब्बल 129 नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक चांगलीच चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे. अंतिम किती उमेदवार रिंगणात उतरतात आणि बंडखोरांना उमेदवारी मिळते की नाही, याकडे कळंबकरांचे लक्ष लागले आहे.
महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख गटांमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांच्या उमेदवारीवरून अद्यापही संभ्रम कायम आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडून तिकीट मिळेल की नाही, याची धास्ती मनात ठेवून पक्षीय आणि अपक्ष अशा दोन्ही मार्गाने आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. स्थानिक पातळीवरील नेत्यांचा कुणाला कौल मिळतो यावर पुढची गणितं अवलंबून असणार आहेत. अर्ज दाखल करण्यास केवळ उद्याचा दिवस शिल्लक असल्याने अजून किती अर्ज दाखल होतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
नगराध्यक्ष पदासाठी 10 महिलांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे . यामध्ये शिंदे सेनेकडून सुनंदा शिवाजी कापसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून धनश्री रुपेश कवडे, राष्ट्रवादीकडून माजी नगराध्यक्षा मीराबाई भागवत चोंदे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून ज्योती सपाटे आणि राष्ट्रवादी पक्षाकडून शेहनाज शेख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आशा सुधीर भवर , व रश्मी संजय मुंदडा तर मनीषा सतपाल बनसोडे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. पक्षीय तिकीट मिळाल्यानंतर यापैकी कोण अंतिम स्पर्धेत बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. ब्युरो रिपोर्ट एमडी लाईव्ह मराठी कळंब
नगरसेवक पदासाठी 129 नामनिर्देशन पत्रे भरली आहेत. यामध्ये अनेक विद्यमान आणि माजी नगरसेवकांसह नवीन चेहऱ्यांचाही समावेश आहे. माजी नगराध्यक्ष पांडुरंग कुंभार, माजी नगरसेविका योजना वाघमारे, अनिता लोमटे, सरला अजय सरवदे, माजी नगरसेवक मुस्ताक खुरेशी, अतुल कवडे, गजानन चोंदे , रोहन पारख, अर्चना प्रताप मोरे, सागर मुंडे, हर्षद अंबुरे यांच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: