पक्ष रिकाम होण्याची भीती, Supriya Sule Rohit Pawar Ajit Dada सोबत जायला तयार | Story Dot Com | Pune
Автор: Story Dot Com
Загружено: 2025-12-25
Просмотров: 13322
#prashantjagtap #ajitpawar #sharadpawar #supriyasule #ncp #ncppune #rashtrwadi #storydotcom
पत्रकारांनी विचारलं Prashant Jagtap यांची समजूत काढण्यात तुम्ही कमी पडलात का, Supriya Sule यांचं उत्तर होतं रोज नयी सुबह होती है, पत्रकारांनी विचारलं प्रशांत जगातपांना राजीनामा का द्यावा लागला, उत्तर होतं रोज नयी सुबह होती है, प्रश्न होता अजित दादांसोबत जायला कार्यकर्त्यांचा विरोध आहे का, उत्तर होतं, रोज नयी सुबह होती है.. प्रशांत जगतापांनी पक्ष सोडताना कारण काय सांगितलं, सुप्रिया सुळेंचं पहिल्या तीन उत्तरांपेक्षा वेगळं उत्तर होतं मेरा पेट बहोत बडा है.. प्रश्न काहीही विचारा, उत्तर एकच होतं.. सुप्रिया सुळे गेल्या २४ तासात दोन वेळा पत्रकार परिषदेला सामोरं गेल्या, पण त्यांनी उत्तर देण्याऐवजी पत्रकारांवरच प्रश्नांचा भडीमार केला. अजित दादांसोबत जाण्यावरुन पवार गटातच दोन मतप्रवाह बनलेत आणि सुप्रिया सुळे यांची त्यातली अडचण स्पष्ट दिसतेय. प्रशांत जगतापांनी भूमिका जाहिर केली की ज्यांनी शरद पवारांचा विश्वासघात केला, ज्यांच्या विरोधात आमचे कार्यकर्ते कठीण काळातही ताकदीने लढले आज त्यांच्याच सोबत निवडणूक लढवली तर जी तत्व पाळून राजकारण केलंय त्याला काहीही अर्थ उरत नाही. हेच मत सुप्रिया सुळेंसमोरही मांडलं, सुप्रिया सुळेंनी दोन दिवस समजूत काढली, स्वतःच सांगितलं की सहा तास प्रशांत दादांची समजूत काढली, पण प्रशांत जगताप काय मागे हटायला तयार नव्हते. अखेर पुण्यातही शेवटची चर्चा झाली आणि प्रशांत जगतापांनी निर्णय जाहिर करुन टाकला की मी या पक्षापासून स्वतःला वेगळं करतोय.. २७ वर्षांनंतर पवारांपासून असा नेता दूर होत होता, ज्याने पक्ष फुटलेला असतानाही पुण्यासारख्या शहरात पक्षाची धुरा सांभाळली, कार्यकर्ते एकत्र ठेवले, मात्र अजित दादांसोबत तडजोड शक्य नाही म्हणून पक्षच सोडला.. पण या सगळ्यात एकेकाळी अजित दादांवर सर्वाधिक राग असलेल्या सुप्रिया सुळेंना पुन्हा का अजित दादांच्या जवळ जावं लागतंय आणि पुण्यातल्या एका निवडणुकीने पवारांची राष्ट्रवादी पुन्हा एकदा का अस्वस्थ झालीय तेच या व्हिडीओत सांगणार आहे..
Join this channel to get access to perks:
/ @storydotcomofficial
Promotion/Collaboration - [email protected]
स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे.
Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you.
आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा -
Facebook - / officialstorydotcom
Instagram - / officialstorydotcom
X - https://x.com/storydotcomnews
Threads - https://www.threads.net/@officialstor...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: