Dr.Vijudada Khune

🌳✌विजू दादा, आनंदी रहा ✌ 🌳
🚩बार्शी "भगवंत नगरी "🚩

पहाटे बार्शी-आगळगाव रोडवर दररोज न चुकता एक हसमुख ,सतेज, ताजेतवाने 58 वर्षाचा एक युवक फिरण्यास आलेला दिसतो तेच म्हणजे डॉक्टर विजयकुमार खुणे उर्फ विजू दादा.
विजू दादा हे पेशाने डॉक्टर परंतु साहित्यक्षेत्रातील एक शीघ्र कवी म्हणून सुद्धा त्यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. विजू दादांचा दिनक्रम म्हणजे दररोज पहाटे बार्शी–आगळगाव रोड वर पाच ते सात किलोमीटर चालणे. सुर्योदयासोबत दररोज एक कवितेची चारोळी व्हिडिओबद्ध करणे व ती सर्वांना व्हाट्सअप व फेसबुकच्या माध्यमातून शेअर करणे. मग त्यांच्या कवितेच्या चारोळ्या आरोग्य,समाजकारण, सांस्कृतिक अर्थकारण,राजकारण ,सण ,समारंभ अशा लहान मोठ्या पासून सर्वांच्या मनाचा ठाव घेणार्‍या असतात व या चारोळीच्या शेवटी ठरलेलं वाक्य म्हणजे' विजू दादा,आनंदी राहा'.