Siddhagirimath_Official

"दक्षिण काशी " असणा-या या कोल्हापुरच्या लौकिकात भर टाकणारा योगी व सिध्दपुरुषांच्या पवित्र वास्तव्याने पुनित झालेला एक प्राचीन मठ ही या पवित्र भूमीत आहे तो म्हणजे " श्रीक्षेत्र सिध्दगिरी मठ" !!

महाराष्ट्राच्या संतभूमीत भारतीय संस्कृती वारसा जपणारा मठ म्हणून कोल्हापूर येथील श्री क्षेत्र सिध्दगिरी मठ विख्यात आहे. श्री काडसिध्देश्वर सांप्रदायाचे मूळ स्थान म्हणुन प्रसिध्द पावलेला "श्रीक्षेत्र सिध्दगिरी मठ" हा सांप्रत कोल्हापूर शहरापासुन दक्षिणेला सुमारे ११ कि.मी. अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ पासुन जवळच निसर्गरम्य परिसरात वसलेला आहे.श्रीक्षेत्र सिध्दगिरी मठ अत्यंत पुरातन, धार्मीक,योगीक व अध्यात्मिक पीठ आहे. याची ओळख "जगद्गुरु काडसिध्देश्वर संस्थान मठ" अशी आहे. या मठाच्या जवळच कणेरी गाव आहे, म्हणूनच मठाला “कणेरी मठ” असेही म्हणतात. संशोधित व प्राप्त ऎतहासिक संदर्भानुसार "श्रीक्षेत्र सिध्दगिरी मठाला" १३५० वर्षांपेक्षा अधिक प्राचीन पंरपरा लाभली आहे