कोकण कन्या - Konkan Kanya

कोकण कन्या चॅनेलवर मी पूनम आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते.

माझ्या माहेरी आणि सासरी सगळेच चवीने खाणारे. दोन्हीकडच्या पाककृती एकपेक्षा एक सरस. आणि मला स्वतःलाही अशा चविष्ट पाककृती बनवायला आणि खाऊ घालायला खूप आवडते. कोकणात असंख्य वैविध्यपूर्ण अशा पाककृती केल्या जातात. लहानपणापासूनच त्यांची चव जिभेवर असल्यामुळे बाहेर हॉटेलमध्ये कोकणी खासीयत या नावावर भरपूर खोबऱ्याचा मारा करून लोकांची फसवणूक होताना दिसली, जी मला अजिबात आवडली नाही.

म्हणूनच अस्सल कोकणी पदार्थ आणि त्यांची पारंपरिक पाककृती सर्वांपर्यंत पोहोचवता यावी याच एका उद्दिष्टाने मी माझे YouTube channel चालू करावे असा सल्ला मला मिळाला. आणि मीही लगेचच तो उचलून घेतला आणि जन्माला आले माझे "कोकण कन्या" हे YouTube channel.

या चॅनेलवर आपल्याला हमखास खात्रीशीर अशाच पाककृती पाहायला मिळतील. ज्या चविष्ट तर असतीलच पण सोबत बनवायला पण तितक्याच सोप्या असतील. आणि शक्य तितक्या tips तर मी देईनच.

तर मग करूया सुरुवात...