Pune Mahanagarpalika: Ajit Pawar Sharad Pawar एकत्र येणार ? काँग्रेसचीही सोबत ? भाजपला कॉर्नर करणार?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-12-22
Просмотров: 11856
#BolBhidu #AjitPawar #SharadPawar
सुरुवात करूयात काही वक्तव्यांपासून, पहिलं वक्तव्य अजित पवारांचं, 'मित्र पक्ष म्हणून एकमेकांचे उमेदवार घ्यायचे नाहीत किंवा माजी पदाधिकारी घ्यायचे नाहीत, असं ठरलं होतं परंतु ते घेतले गेले आहेत. कोणी सुरुवात केली तर समोरचाही सुरुवात करतो.' हे वक्तव्य आलं होतं पुण्यातून. नगरपालिकांच्या निवडणुकीत दादांनी पुणे जिल्हा राखलेला असताना. आता दुसरं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांचं 'अजित पवार आणि आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्रित लढू शकणार नाही, आम्हाला दोघांनाही एवढं राजकारण समजतं की आम्ही एकत्र लढलो, तर तिसऱ्याचा फायदा होईल आणि तिसऱ्याकरता आम्ही जागा सोडणार नाही, आम्ही एकमेकांच्या विरोधात लढू पण मैत्रीपूर्ण लढू.' हे सुद्धा वक्तव्य आलेलं पुण्यातूनच. नगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल लागण्याआधी. फडणवीसांनी जेव्हा विरोधात लढू असं सांगितलं होतं, तेव्हा अजित पवार म्हणाले होते, 'फडणवीस विचार करुनच बोलले असतील.'
पण मग १६ दिवसात असं काय घडलं की ? अजित पवार थेट कोणी सुरुवात केली तर समोरचाही सुरुवात करतो, या लाईनवर आले ? एवढंच नाही, तर अजित पवार-सुप्रिया सुळे यांच्यात चर्चा झाल्याचा, पुण्यात तुतारी नाही तर राष्ट्रवादीचे उमेदवार सरसकट घडाळ्यावर लढणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या, अजित पवारांनी सतेज पाटलांना फोन केल्याच्या बातम्या आल्या. काय घडलं याचं उत्तर आहे, भाजपने दादांना लावलेला सुरुंग आणि काय घडतंय, याचं उत्तर आहे, दादांचा प्लॅन ऍक्टिव्ह. अजित पवारांनी पुण्यात नेमका कोणता प्लॅन ऍक्टिव्ह केला आहे ? हा प्लॅन भाजपला कॉर्नर कसा करु शकतो ? पाहुयात या व्हिडीओमधून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: