मेथी भाजी रेसिपी- | Avishri Marathi Receipe
Автор: Avishri
Загружено: 2025-12-12
Просмотров: 819
साहित्य:
मेथीची जुडी – १
कांदा – १-२ (बारीक चिरलेला)
लसूण – ८–१० पाकळ्या
हिरवी मिरची – ५- ६
खोबरे - २ टेबलस्पून
तेल – २ टेबलस्पून
हळद – ¼ टीस्पून
मीठ – चवीनुसार
कृती:
मेथीची पाने स्वच्छ धुवून चाळनीत ठेवा.
लसूण ,खोबरे व हिरवी मिरची मिक्सरमध्ये वाटून घ्या .
कढईत तेल गरम करून त्यात कांदा घालून तो सोनेरी होईपर्यंत परता, लसूण ,खोबरे व हिरवी मिरची परतून घ्या आणि २–३ मिनिटे परता
चिरलेली मेथी घालून नीट मिसळा.
मीठ घालून ५–७ मिनिटे मंद आचेवर शिजू द्या.
भाजीतील पाणी आटल्यावर भाजी छान मऊ झाली की गॅस बंद करा.
कशाबरोबर खावी?
पोळी, भाकरी, किंवा चपातीसोबत खूप छान लागते .
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: