Delicious Bharli Vangi | चमचमीत भरली वांगी
Автор: Pratibha Gujar
Загружено: 2025-05-03
Просмотров: 14998
@Jyoti_kitchen88
नमस्कार मंडळी
मी प्रतिभा गुजर तुमचं स्वागत करत आहे.आज आपण चमचमीत भरली वांगी करणार आहोत.
त्यासाठी लागणारे साहित्य=
वांगी -८
कांदा - १
कोथिंबीर
अद्रक लसूण पेस्ट - १/२ चमचा
सुकं खोबरं - १ वाटी
शेंगदाणे - १/२ वाटी
तिळ -२ चमचा
हळद - १ चमचा
धणे मसाला -१ चमचा
मिठ - १ चमचा
लाल मिरची पावडर -२ चमचा
टमाटे -१
तेल - ३ पळी
शहाजिरे - १/२ चमचा
दालचिनी -४-५ तुकडे
विधी =
शेंगदाणे, खोबरं,तिळ भाजून घ्या.कांदा चौकोनी कट करून वांगी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कट करून मिठाच्या पाण्यात घालून ठेवा.मिक्सरच्या भांड्यात खोबरं,तिळ,टमाटे,हळद,मिठ, लाल मिरची पावडर, अद्रक लसूण पेस्ट, कोथिंबीर,शहाजीरे, दालचिनी, धणे मसाला हे एकदम बारीक वाटावे व नंतर शेंगदाणे घालून ते ओबडधोबड वाटावे.हे वांगी चं मसाला तयार झाले आहे आता हा मसाला कट केलेल्या वांगी मध्ये भरने.कढईत ३ पळी तेल घालून त्यात कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्या व नंतर वांगी घालून ते तेलात २ मी.परतून घ्या शिल्लक मसाला घालून ते परतून घ्यावा व नंतर पाणी घालून ते झाकून ५ मी.बारिक गॅसवर भाजी शिजवावी.आता आपले चमचमीत भरली वांगी जेवणासाठी तयार आहेत.
धन्यवाद 🙏🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: