Devendra Fadnavis Brother, Girish Mahajan Wife ते Santosh Bangar यांची भावजय, घराणेशाहीचे चेहरे कोण?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-11-21
Просмотров: 26161
#BolBhidu #LocalBodyElection #DevendraFadnavis
देशातल्या राजकारणाला घराणेशाही नवी नाही. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ती पाहायला मिळतेच. गेल्या वर्षी राज्याच्या विधानसभेत निवडून गेलेल्यांपैकी ७० च्या आसपास आमदारांना घराणेशाहीची पार्श्वभूमी आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही मोठ्या प्रमाणात घराणेशाहीचा प्रभाव दिसून येतोय. नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुकीत राजकीय पक्षांनी नेतेमंडळींची मुलं, पत्नी आणि इतर नातेवाईकांना उमेदवारी दिली आहे. आरक्षणाचा आपल्या सोयीने लाभ उठवत, सत्ता आपल्याच घरात ठेवण्यासाठी बऱ्याच ठिकाणी नातेवाईकांसाठी फिल्डिंग लावण्यात आल्याचं दिसतंय. यामध्ये कोणताच पक्ष मागे नाही.
त्यातही भाजपमध्ये कधीही घराणेशाही होत नाही, असा दावा या पक्षाच्या नेत्यांकडून केला जातो. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पणनमंत्री जयकुमार रावल, कामगारमंत्री आकाश फुंडकर, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे या सगळ्या मंत्र्यांचे नातेवाईक निवडणूक रिंगणात उतरले आहेत. काहींचे नातेवाईक बिनविरोध निवडून आले आहेत, तर काहींनी बिनविरोध निवडून आणले आहेत. या निवडणुकीत राज्यात कोणाच्या नातेवाईकांना उमेदवारी मिळाली? कुणाचे नातेवाईक बिनविरोध निवडून आले? ते कसे बिनविरोध निवडून आले? कोणाचा दबाव होता? हे सगळं जाणून घेवू या व्हिडिओमधून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: