Gajanan Kale | Raj Thackeray | शौचालय, मंदिर, स्मशानभूमीत मतदार | फडतूस मुख्यमंत्री | मुलाखत
Автор: Lay Bhari News
Загружено: 2025-11-01
Просмотров: 7827
#rajthackeray #gajanankale #devendrafadnavis #सत्याचामोर्चा #sharadpawar #uddhavthackeray
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सध्याचे महाराष्ट्रातील सरकार हे बोगस मतदारांच्या आधारावर सत्तेत आलेले आहे. या बोगस मतदारांच्या बळावरच ते 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन' असे म्हणत होते, अशी संतप्त भावना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते गजानन काळे यांनी लय भारी चे संपादक तुषार खरात यांच्याशी बोलताना व्यक्त केले आहे. नवी मुंबईतील पालिका आयुक्तलयांच्या बंगल्यावर झालेली बोगस मतदार नोंदणी शौचालयात झालेल्या मतदारा नोंदणी याचा पर्दापाश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. हे भयानक बोगस प्रकरण गजानन काळे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शोधून काढले आहे. त्या पार्श्वभूमीवर गजानन काळे यांची मुलाखत तुषार खरात यांनी घेतली. बोगस मतदारांना फटकवा हा राज ठाकरे यांनी दिलेला आदेश आम्ही अंमलात आणणार आहोत हे सांगतानाच नवी मुंबई परिसरातील 35000 बोगस मतदार नोंदणी मधील अनेक धक्कादायक प्रकार आपण चव्हाट्यावर आणणार आहोत, असे काळे म्हणाले. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना आपण त्यांच्या बंगल्यावर आंदोलने केली. मंत्रालयात आंदोलने केली. विलासराव देशमुख यांनी त्या आंदोलनाची गंभीर दखल तर घेतलीच. परंतु आमच्यावर एक सुद्धा केस टाकली नाही. परंतु आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फडतूस मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे लोकशाही संकटात सापडली असल्याचे गजानन काळे म्हणाले.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: