तोंडाची चव वाढवणरं, चटपटीत, रसरशीत टोमॅटो capsicum भरीत/टोमॅटो चटणी
Автор: VMi's Khadyayatra Marathi
Загружено: 2024-10-08
Просмотров: 404
Welcome to VMi's Khadyayatra Please subscribe to my channel Press the bell icon
आज पाहूया एकदम झटपट होणारं पण चटकदार चमचमीत असं टोमॅटो कॅप्सिकम भरीत याला कोणी टोमॅटो चटणी सुद्धा म्हणू शकतं बिन कांदा लसणीचा सुद्धा हा पदार्थ एकदम चविष्ट होतो तुम्ही असं करून पहा याला फार काही साग्र संगीत तयारी करावी लागत नाही
#टोमॅटोभरीत
#tomatochutney
#capsicumrecipes
#tangytreats
#tomatobharta
#tastyfood
#quickrecipe
#vmiskhadyayatra
#easycooking
#redfood
साहित्य
3 टोमॅटो
1/2 लाल सिमला मिरची
फोडणी
तेल 2 चमचे
मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता
लाल तिखट 1 चमचा
पादेलोण साधं मीठ
गूळ पावडर 1 चमचा
शेंगदाणा कूट 1 किंवा 2 चमचे
टोमॅटो आणि सिमला मिरची गॅस वर जाळी ठेऊन चांगली भाजून घ्यायची सालं काढून smasher ने smash करा किंवा mixer ला अगदी 1ते 2 सेकंद पल्स mode वर फिरवून घ्या तुम्हाला फार रस नको असेल तर हे भरीत कढईत थोडे आटवून घेऊ शकता त्यानंतर त्यात सगळे मसाले गूळ आणि दाण्याचं कूट घालून मिक्स करा हे भरीत पोळी भाकरी ब्रेड भात पराठा काशाबरोबरही खायला छान लागते
भरताचे काव्य:
चटपटीत अन चटकदार
लाल भरीत हे खुमासदार
खाल जर का असे एकदा
करतची राहाल वारंवार ||
टोमॅटो घ्यावे पिकलेले
ढोबळीला अर्धे कापले
आणि सगळे गोळा केले
नेहमीचे ते मीठ मसाले ||
खट्ट करुनी गॅस पेटवा
त्यावर ऐसी जाळी ठेवा
ओय ओय ओरडले तरीही
दोन्ही जिन्नस खरपूस भाजा ||
साले पटपट काढून टाका
Smasher घेऊन बारीक ठेचा
किंवा मोठे तुकडे करुनी
Mixer ला हलकेची फिरवा ||
तेलामध्ये जिरे मोहरी
तडतडण्याची क्रियाच न्यारी
तीळ हिंग अन कढी पत्त्याने
करू फोडणी खमंग भारी ||
अशी फोडणी करून आता
लाल मिश्रणावरती ओता
चुरर चुरर संगीत निनादे
दोघांचे त्या मीलन होता ||
लाल तिखट मग पटकन उठले
टाक मला गे स्वतः म्हणाले
मीठ मिरपुडीनेही नंतर
स्वतःस हर्षे झोकून दिधले ||
गूळ एकटा पुढे जाहला
गोडी आणीन मीच, म्हणाला
कूट बिचारे हिरमुसले
नंबर त्याचा शेवट आला ||
मिश्रण सारे ढवळ ढवळले
एकजीव मग अवघे झाले
रसरशीत अन् चविष्ट चटका
नांव तयाचे भरीत ठेवले ||
रस नको, जर असे वाटले
भरीत थोडे आटवून घ्यावे
पोळी भाकरी पाव पराठा
भातासह वा असेच खावे ||
आवडले तर करा वाहवा
लाइक शेअर ने पुढे पाठवा
Vmis ला सुब्स्कृबे करुनी
बेल बाजूची टिंग वाजवा ||
रसाळ आणि चटपटीत
टोमॅटो-सिमला भरीत
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: