मैदा न वापरता पातळ आवरणाची तेलकट न होणारी 💯 खुसखुशीत मटार करंजीचे सिक्रेट|Matar Karanji |मटार करंजी
Автор: Preshita's Kitchen
Загружено: 2026-01-03
Просмотров: 12491
मैदा न वापरता पातळ आवरणाची तेलकट न होणारी 💯 खुसखुशीत मटार करंजीचे सिक्रेट|Matar Karanji |मटार करंजी
#मटारकरंजीरेसिपीमराठी #matarkaranji #ताज्यामटारचीकरंजी
बाजारात मटार दिसायला लागले की आपल्याला मटारचे काय काय पदार्थ करु असे होऊन जाते. मटार भात, पावभाजी, मटार उसळ, मटार कटलेट हे सगळे आपण नेहमीच करतो. पण मटार करंजी आपण करतोच असे नाही. खुसखुशीत आणि अतिशय चविष्ट अशी ही मटार करंजी करायला सोपी असून चवीलाही अतिशय छान लागते. यासाठी फारसा वेळ लागत नसून अगदी कमीत कमी पदार्थांमध्ये झटपट होणारी ही रेसिपी थंडीच्या दिवसांत खायला फार मस्त लागते. सकाळच्या नाश्त्याला,चहासोबत किंवा अगदी जेवणातही साईड डीश म्हणून आपण हा पदार्थ नक्की करु शकतो. विकतचे तळलेले सामोसे, वडे खाण्यापेक्षा घरीच असा चविष्ट पदार्थ केला तर बाहेर काहीतरी चमचमीत खावे अशी इच्छाही होणार नाही आणि लहानांपासून जेष्ठांपर्यंत सगळेच हा पदार्थ खाऊन मनोमन खूश होतील. पाहूया मटार करंजी करण्याची सोपी रेसिपी
साहित्य:-
मटार - दिड कप
बटाटा - १/२ कप
गव्हाचे पीठ- १ कप
बारीक रवा -१ कप
साजूक तूप - पाव कप
१ चमचा साखर
पाणी - गरजेनुसार
चवीनुसार मीठ
आलं - १ इंच
हिरव्या मिरच्या - ३ ते ४
मुठभर कोथिंबीर
खोवलेले खोबरे- १/२ कप
तेल - २-३ मोठे चमचे
हिंग - १/४ चमचा
जिरेपूड - १/२ चमचा
धणेपूड - १/२ चमचा
आमचूर पावडर - १/२ चमचा
१/२ चमचा साखर
चवीनुसार मीठ
तळण्यासाठी तेल.
रेसिपी आवडली असेल तर एक लाईक 👍 करा शेअर करा आणि Preshita's Kitchen ला सबस्क्राईब 🔔 करा 😊🙏
#preshita #food #recipe #cooking #easyrecipe #indianrecipe #kitchenhacks #kitchen #मटार #matarkaranji #मटारकरंजी #greenpeas #greenpeasrecipe #ताज्यामटारचीकरंजी #freshgreenpeas #मटारकचोरी #matarkachori #matarpaneer #matarkeemarecipe #matarkisabji #matarpuri
Thanks for Watching Preshita's Kitchen 😊🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: