💞🙏कोकणातील दापोली असोंड गावातील श्री.सोमजाई मातेचा साना भरण्याचा कार्यक्रम आणि पारंपरिक देवाचे खेळ..
Автор: कोकण सहवास
Загружено: 2023-03-20
Просмотров: 2665
🙏💞 नमस्कार मित्रांनो.. कोकणातील शिमगा उत्सवाच्या प्रत्येक गावातील रुडी परंपरा वेगवेगळ्या आहेत.तसेच आज मी तुम्हांला दापोली असोंड गावातील गावातील श्री. सोमजाई मातेच्या साना भरण्याचीं परंपरा विडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो. श्री. सोमजाई मातेची साना ही असोंड गावच्या पश्चिमेला गावाच्या बाहेर आहे. तरीही ग्रामस्थ आणि पाहुणे चाकरमानी मोठया संख्येने येतात. सानेवर साधा भरण्याचा कार्यक्रम हा असोंड गावातील पड्याळवाडी यांच्या काटखेळाने सुरुवात होते. त्यांचा खेळ झाल्यावर टेमकरवाडी यांचा नकट्याचा खेळ सुरू होतो. नकट्याच्या खेळाला मोठ्या पासून लहान पर्यंत सगळ्यांना उत्सुकता असते. नकट्याचा खेळ लहान मुलांचा आवडता खेळ आहे. लहान मुलं त्याला पाहून घाबरतात तरीही नकट्याच्या मागून धावण्याची मजाच वेगळी असते. नकट्याचा खेळ झाल्यानंतर कुंभारवाडीतील सोमजाबाईची मोठ्या बांधावर जायची हा अजरामर केलेले गीत घेऊन श्री.भिकू खेडेकर हे देवाचे खेळी म्हणजेच कोकणातील राधेचा खेळ या गाण्याची खासियत म्हणजे श्री. सोमजाई आई हिच्यावर प्रेम करणाऱ्या भक्ताच्या अंगावर शहारे आणि डोळे पाणवल्याशिवाय राहणार नाही. असा हा देवांच्या खेळाचा खेळ झाल्यावर श्री. सोमजाई मातेचा मांड भरला जातो. नवविवाहित पुरुष स्त्रिया सानेच्या सभोवताली पाच फेऱ्या मारून श्री. सोमजाई मातेचा आशीर्वाद घेऊन नवं विवाहित जीवनाला सुरुवात करतात.
💞🙏धन्यवाद 🙏💞
👉 व्हिडिओ आवडल्यास आपल्या हक्काच्या चैनलला लाईक, शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका!🙏🙏🙏
.....................................................................................👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇#KONKAN/#HOLI/#VIDEO/#LIKE/#SHARE/#SUBSCRIBE/#FOLLOW
for more such amazing videos 💞💐💐💐
.....................................................................................👉konkan sahwas Facebook page-
👉 / konkan sahwas....
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: