Navi Mumbai Election: Ganesh Naik vs Eknath Shinde संघर्षाचा Anand Dighe यांच्यापासूनचा पूर्ण इतिहास
Автор: BolBhidu
Загружено: 2026-01-10
Просмотров: 126070
#BolBhidu #EknathShinde #GaneshNaik
एकनाथ शिंदेंचा टांगा पलटी करेन आणि घोडे बेपत्ता, त्यांनी मला हलक्यात घेऊ नये. एकनाथ शिंदेंना हे आव्हान ठाणे जिल्ह्यातला एक नेता देतो. एखाद्या नवख्या माणसाला ही गोष्ट पॉलिटिकल स्टंट वाटू शकते, पण हा स्टंट नाहीये, हा संघर्षाचा नवा अंक आहे. जिल्ह्यावर वर्चस्व मिळवायची इच्छा असलेल्या एका नेत्याचं राजकारण एका शहरापुरतं मर्यादित राहिलं आणि त्याच जिल्ह्यातून पुढे आलेला नेता, जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता राज्यापर्यंत पोहोचला. सगळ्या राज्यात ताकद तयार केली, पण या आव्हान देणाऱ्या नेत्याच्या शहरात पाय घट्ट रोवू शकला नाही. ऐकायला किचकट वाटत असला, तरी हा संघर्ष सरळसोट आहे, संघर्ष बालेकिल्ला राखण्याचा आहेच, पण समोरच्याचा बालेकिल्ला मिळवण्याचाही. म्हणूनच म्हणलं शिंदेंना दिलेलं आव्हान हा स्टंट नाही, संघर्षाचा नवा अंक आहे, एकनाथ शिंदे विरूद्ध गणेश नाईक, या संघर्षाचा नवा अंक.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या निमित्ताने या दोन नेत्यांमधला संघर्ष सध्या टोकाला गेलाय. शिंदेंनी 'नवी मुंबईचा विकास म्हणजे वरुन कीर्तन आतून तमाशा' अशी टीका नाईकांवर केली, नाईकांनी, 'भाजपने परवानगी देऊद्या, शिंदेंचा टांगा पलटी करतो,' असं आव्हान दिलं. पण मुळात नाईक परवानगीची वाट बघतील का ? नाईकांना परवानगी देणं बाकी आहे का ? असे प्रश्न पडावेत इतका राडा ठाण्यात झाला. पण आता बॅटलग्राऊंड नवी मुंबईकडे शिफ्ट झालंय, फायनल डेस्टिनेशन ठाणेच असलं, तरी जुन्या मैदानात, जुने नेते, जुना संघर्ष आणि नवा अंक. निमित्त नवी मुंबई महानगरपालिका पण हा गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे संघर्षाचा सगळा इतिहास.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: