वर्षातून एकदाच, एका रात्रीसाठी उमलणारं सुंदर फुल | ब्रह्मकमळ | बेथलेहमचे फूल | Vasai
Автор: The Mixed Bag
Загружено: 2024-07-31
Просмотров: 1245
ब्रम्हकमळ ह्या फुलाचा पांढरा शुभ्र रंग मनाला आकर्षित करतो. हे फुल मोठं असलं तरी खूप नाजूक असून मऊ मुलायम आणि काहीशा पारदर्शक पाकळया सुंदर दिसतात. फुलाच्या मध्ये असंख्य पुंकेसर असून या पुंकेसरांच्या मधोमध असतो कुक्षीवृंत. कुक्षीवृंताच्या टोकाशी असणा-या चांदणीसारख्या कुक्षी पण फुलासारख्याच वाटतात. ब्रम्हकमळ रात्री पूर्णपणे उमलतं, हे त्याचे मुख्य वैशिष्टय आहे. पूर्ण उमलल्यावर त्याचा मंद सुगंध सगळीकडे पसरतो. ब्रम्हकमळ हे खरं तर मूळचं वाळवंटातलं फुल. याच नाव जेरूसलेम लीली किंवा बेथलहम लीली.
ब्रम्हकमळ हा निवडुंगाचा एक प्रकार. या झाडांची पानं खोडात रूपांतरित होतात आणि त्यांनाच कळया येतात.
खोडच अन्न तयार करण्याचं काम करतं म्हणूनच ब्रम्हकमळाला शास्त्रीय भाषेत फायलोकॅक्टस किंवा एपिफायलम म्हणतात. वाळवंटात रात्रीचे तापमान थोडेसे थंड असते. त्यामुळे हे फुल रात्री उमलते. रात्रीच्या अंधारात लक्षात यावे म्हणून त्याचा रंग पांढरा असतो. हा रंग आणि मंद वास किटकांना आकर्षित करतो.
अस्सल ब्रम्हकमळ हिमालयात उगवंत. हे फुल झेंडू, शेवंतीच्या प्रकारातले असते आणि त्याचे शास्त्रीय नाव सॉसारिया लापा असे आहे. ब्रम्हकमळाची झुडपं साधारणत: एक मीटर उंचीची असतात. फुलांबरोबर या झुडपांची पानं पण सुगंधी असतात. ख-या ब्रम्हकमळाचं दर्शन खूपच मोहक असतं. खरं ब्रम्हकमळ दिवसेंदिवस खूपच दुर्मिळ होत चाललंय. त्यांचे जतन आणि संवर्धन होणं खूप गरजेचे आहे.
(स्रोत - आंतरजाल)
🟡Our Facebook page
https://www.facebook.com/dmixedbag?mi...
🟡follow us on Instagram
https://instagram.com/themixedbag17?i...
🟡Our WhatsApp channel link
https://whatsapp.com/channel/0029VaMc...
#trending #bramhakamal #ब्रह्मकमळ #बेथलहेमलीली
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: