Congress सोबत नसताना, Raj ठाकरेंशी युती झालेली असतानाही Uddhav thackeray मुंबईत मुस्लिम मतं मिळवणार?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-01-12
Просмотров: 43432
#BolBhidu #MuslimVoters #UddhavThackeray
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक. या निवडणूकीची चर्चा कधीपासून सुरु झाली ? तर मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या ठाकरे बंधूंची सत्ता आली, तर खान महापौर होईल, या वक्तव्यापासून. भाजपने पहिलाच डाव हिंदुत्वावर खेळला. लोकसभा आणि विधानसभेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एकगठ्ठा मुस्लिम मतं मिळाली होती, त्यामुळं ठाकरे हे विधान लगेच खोडून काढणार नाहीत आणि खोडलंच तर त्यांना बॅकफूटवर जावं लागेल असा भाजपचा ट्रॅप होता. पण अशातच मुंबईत मराठी महापौर होणार का ? या प्रश्नावर भाजप नेते फसले आणि भाजपचा डाव गंडला. निवडणूक हिंदू-मुस्लिम मुद्द्यावर न जाता मराठी-अमराठी, मराठी-गुजराती आणि मुंबईकर विरुद्ध अदानी अशी गेली. आता या सगळ्यात मुस्लिम मतदार चर्चेतून बाजूला गेले का ? तर नाही.
मुळात मुस्लिम मतदारांची संख्या हा मुंबईत निर्णायक फॅक्टर आणि त्यापेक्षा निर्णायक गोष्ट म्हणजे मुस्लिम मतदारांचं एकगठ्ठा मतदान हा डिसायडिंग फॅक्टर. पण यंदा हा फॅक्टर ठाकरेंच्या मागे उभा राहील का ? अशी चर्चा होती. कारण भोंग्यांचा मुद्दा जोरा वाजवणाऱ्या राज ठाकरेंचं सोबत येणं, काँग्रेस -ठाकरे सोबत नसणं, अशा फॅक्टरवर उद्धव ठाकरेंची अडचण होईल, असे अंदाज होते, पण सध्या तरी मुस्लिम मतदारांमध्ये ठाकरेंचं वारं वाहताना दिसतंय. पण असं म्हणायची कारणं काय ? ठाकरेंना हे जमलं कसं ? आणि मुस्लिम मतं ठाकरेंसाठी इलेक्शन फिरवतील का ? सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा व्हिडीओ.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: