मानसिक विकार दूर होण्याकरिता श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील मंत्र
Автор: SADGURUBODH
Загружено: 2025-08-07
Просмотров: 3099
परमपावन श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राचे माहात्म्य आणि त्यातील अद्भुत मंत्रप्रयोग
भाग - तेरावा
६. मानसिक विकार दूर होण्याकरिता मंत्र
सर्व प्रकारचे मानसिक रोग, मानसिक विकृती दूर होण्याकरिता प्रस्तुत मंत्राचा प्रयोग केला जातो. हा स्वानुभूत सिद्ध मंत्रप्रयोग आहे. कोणतेही सश्रद्ध स्त्री-पुरुष भक्त श्रद्धेने या मंत्राचा सांगितल्याप्रमाणे जप करून अनुभूती घेऊ शकतात.
वेद्यो वैद्य: सदायोगी वीरहा माधवो मधु: ।
अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबल: ॥३१॥
आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा स्नानानंतर शुचिर्भूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची त्याप्रमाणे मनोभावे प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनातल्या मनात प्रेमादरपूर्वक जप करावा आणि अनुभूती घ्यावी. आपण करीत असलेल्या मंत्राबद्दल आणि मंत्राच्या देवतेबद्दल आपल्या हृदयात शंकारहित श्रद्धा असणे ही अशा सर्व उपासनांसाठीची अतिशय महत्त्वाची अट असते.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे.)
#sadhana #mahayog #shireeshdadakawade #bhaktimarg #शिरीषदादाकवडे #सहस्रनामस्तोत्र #विष्णुसहस्रनाम #vishnusahasranam #naam #naammahima #mantra #मनोरोग #मानसिकस्वास्थ्य
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: