घरगुती चहा मसाला पावडर | Homemade vs Store-Bought TEA MASALA POWDER Which is Better for Indian Tea
Автор: Neelus Instant Delights
Загружено: 2025-11-01
Просмотров: 753
घरच्या घरी बनवा अरोमॅटिक आणि हेल्दी चहा मसाला पावडर ☕✨
या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकाल पारंपारिक भारतीय मसाला चहा मसाला कसा बनवायचा — दालचिनी, वेलची, लवंग, मिरे, सुंठ यांसारख्या नैसर्गिक मसाल्यांनी बनवलेला हा मसाला तुमच्या चहाला देईल एक खास स्वाद आणि सुगंध.
👉 या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल:
घरगुती Tea Masala कसा तयार करायचा
परफेक्ट चहा मसाल्याचं प्रमाण
लांब काळ टिकण्यासाठी साठवण्याचे टिप्स
मसाला चहा बनवण्याची सोपी पद्धत
जर तुम्हाला चहा आवडत असेल आणि दररोज काहीतरी स्पेशल प्यायचं असेल तर ही रेसिपी नक्की बघा!
📌 शेवटपर्यंत बघा कारण शेवटी काही खास टिप्स आहेत ज्यामुळे तुमचा चहा बनेल एकदम परफेक्ट!
👍 लाईक करा, 💬 कमेंट करा आणि 🔔 सबस्क्राईब करा आणखी अशा घरगुती मसाला रेसिपीसाठी.
Transcript for घरगुती चहा मसाला पावडर | Homemade vs Store-Bought TEA MASALA POWDER Which is Better for Indian Tea
00:00 - Introduction
00:03 - चॅनलवर तुमच सगळ्यांच स्वागत आहे.
00:06 - या दिवसात सगळीकडे परतीचा पाऊस चालू
00:10 - असल्याने सर्वत्र अगदी थंड वातावरण झालेलं
00:14 - आहे. व आता थोड्याच दिवसात थंडी ही सुरू
00:17 - होणार आहे. त्यामुळे अशा वेळेला आपल्याला
00:20 - एक मस्त असं गरम गरम चहा प्यावासा वाटतो व
00:24 - त्यात जर
00:26 - चहाचा मसाला जर घातला तर त्याची टेस्टच
00:29 - काही वेगळी असते. त्यामुळे आज मी तुम्हाला
00:34 - चहाचा मसाला बनवण्याची एक सोपी पद्धत
00:37 - दाखवणार आहे. चला तर मग साहित्य बघूया.
00:42 - इथे मी या छोट्या वाटीच प्रमाण घेतलेल
00:46 - आहे. व ही वाटी मी पूर्ण भरलेली नाहीये.
00:50 - साधारण 3/4 भरलेली आहे. इथे मी घेतले 3/4
00:56 - कप काळीमिरी.
00:59 - साधारण अर्धी वाटी लवंग
01:03 - एक वाटी हिरवी वेलची
01:07 - थो कप बडी शेप घेतलेली आहे इथे मी घेतलय
01:12 - थो कप सुंठ
01:16 - ज्याला ड्राईड आलं असं म्हणतात इथे मी एक
01:21 - जायफळ
01:23 - त्याची पूड करून घेतली आहे
01:26 - इथे मी घेतली आहे तुळशी ची पानं त्यात मी
01:30 - थोडीशी कणसई घेतली आहेत व
01:35 - अर्धा वाटी
01:37 - दालचिनीच्या स्टिक्स
01:42 - इथे मी एक कढई गरम करायला ठेवली आहे ही
01:45 - अगदी लो फ्लेमवर आपल्याला हे सगळे आता
01:49 - जिन्नस भाजून घ्यायचे आहेत व तेही अगदी
01:53 - दोन ते तीन मिनिटांकरता
01:56 - इथे मी घेते
01:58 - काळी मिरी
02:02 - लवंगा
02:07 - हिरवी वेलची
02:12 - बडीशे
02:16 - दालचिनी
02:20 - सुंठ
02:24 - जायफळ
02:29 - हे आता मी अलगद अगदी
02:33 - भाजून घेणार आहे हे आपल्याला जास्त
02:36 - भाजायचं नाहीये फक्त दोन ते तीन मिनिट
02:41 - भाजलं की पुरे होतं
02:50 - सगळ्यात शेवटी आपण त्यात
02:54 - तुळशी घालणार आहोत
02:57 - हे सगळे जिन्नस जे आहे ते सर्दी खोकला
03:01 - किंवा डायजेशन करता अगदी गुणकारी ठरतात व
03:06 - त्या बरोबर आपली ते इम्युनिटी बूस्टर
03:11 - म्हणून पण त्याचा चांगला उपयोग होतो.
03:15 - आता चांगली दोन-तीन मिनिट झालेली आहेत.
03:19 - आपण हे आता काढून घेऊया व थोडा वेळ थंड
03:23 - होण्यासाठी ठेवून द्यायचंय
03:29 - आपला हा मसाला आता छान थंड झालेला आहे व
03:33 - वासही फार सुरेख सुटलेला आहे आपण आता तो
03:37 - मिक्सी जार मध्ये त्याची पावडर करून घेऊया
03:56 - आपला हा मसाला आता रेडी झालेला आहे वासही
03:59 - अगदी सुरेख सुटलेला आहे. तुम्ही पाहू शकता
04:03 - हा मी अगदी बारीक असा वाटलेला नाहीये हा
04:08 - थोडासा जाडसरच ठेवायचा आहे कारण आपण
04:11 - जेव्हा चहा करतो व गाळण्याने गाळतो तेव्हा
04:16 - अगदी बारीक असल्याने ते गाळण्यातून आपल्या
04:19 - कपात पडायची शक्यता असते. चला तर मग आता
04:23 - आपण चहा करायला सुरुवात करूया.
04:28 - आता आपण चहा करायला सुरुवात करूया इथे मी
04:31 - एका भांड्यात एक कप पाणी घेतलेल आहे पाणी
04:36 - उकळलं की त्यात आता मी
04:40 - साधारण दोन छोटे चमचे चहाच चहाची पावडर
04:44 - घालणार आहे
04:48 - तुम्हाला जर चहा पाहिजे असला तर
04:52 - तुम्ही चहाची पावडर ऍडजस्ट करू शकता
04:58 - आता पाणी छान उकळलं
05:01 - की त्यात आता मी
05:07 - दोन चमचे साखर घालणार आहे हे मी अगदी छोटे
05:11 - चमचे घेतलेले आहे साखरही तुम्ही तुमच्या
05:14 - आवडीनुसार
05:16 - काही जणांना गोड पाहिजे अस खूप गोड पाहिजे
05:19 - असत चहा त्याप्रमाणे तुम्ही ऍडजस्ट करून
05:22 - घेऊ शकता
05:27 - आपला हा चहा आता छान उकळलेला आहे त्यात
05:30 - आता मी एक कप दूध घालतेय
05:39 - आपल्याला दुधाच प्रमाण जास्तही घ्यायचं
05:41 - नाहीये त्यामुळे आपला चहा सपक होण्याचे
05:45 - चान्सस असतात आपला हा चहा आता उकळत
05:50 - आल्यावर त्यात आता मी अर्धा चमचा
05:54 - चहाचा मसाला घालणार आहे चहाचा मसाला
05:58 - घातल्यावर तो जास्त उकळू द्यायचा नाहीये
06:02 - कारण चहाच्या मसाल्याचा जो फ्लेवर व
06:05 - त्याची टेस्ट असते ती आपल्याला बिघडवायची
06:08 - नाहीये त्यामुळे थोडासा चहा उकळला की आपण
06:12 - तो गॅसवरून
06:14 - काढून घेऊया
06:23 - असा हा आपला सुरेख मसालेदार चहा आता रेडी
06:27 - झालेला आहे. तुम्ही ह्या मसाल्याची रेसिपी
06:31 - नक्कीच ट्राय करून बघा.
06:33 - हा मसाला इथे मी एका एअर टाईट बरणीत भरून
06:38 - ठेवलेला आहे हा मसाला तुम्ही दोन ते तीन
06:41 - महिने अगदी आरामात स्टोअर करून ठेवू शकता
06:45 - व थंडीच्या सीजन मध्ये ह्याचा अगदी स्वाद
06:50 - घेऊन तुम्ही चहा मस्त रेलिश करू शकता.
06:54 - तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर
06:57 - नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर व
07:00 - सबस्क्राईब करायला विसरू नका व तुम्हाला
07:04 - हा मसाला आवडला तर मला कमेंट करून नक्की
07:07 - कळवा थँक्यू
#घरगुतीचहामसाला #teamasala #ChaiMasala #MasalaChai #IndianTea #ChaiRecipe #ChaiLovers #TeaPowder #IndianMasala #HomemadeMasala #ChaiTime #DesiChai #ChaiAddict #TeaRecipe #MasalaPowderRecipe
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: