आम्ही नाचत पंढरी जाऊ.
Автор: Pratima Sawle - Muktai Bhajan Mandal
Загружено: 2026-01-06
Просмотров: 5936
आम्ही नाचत पंढरी जाऊ
एक वारकरी वाजवी खंजिरी
तेथे बैसोनी अभंग गाऊ ||धृ||
पायामध्ये घुंगरू हातामध्ये चिपळ्या
आणि मुखाने विठ्ठल गाऊ ||1||
काळया दत्ता पाशी घालू उजवी त्यासी
नगर प्रदक्षिणा मग घालू ||2||
जाऊ कोण्या वाटा मधल्या हो पेठा
राऊळाचे हो दर्शन घेऊ ||3||
जाऊ वाळवंटी चंद्रभागे तटी
पुंडलिकाचे दर्शन घेऊ ||4||
पांडुरंग पिता रखुमाई माता
पुंडलिक सखा माझा भाऊ ||5||
राम कृष्ण हरी म्हणती वारकरी
गरुड खांबा आलिंगन देऊ ||6||
तुका म्हणे चला जाऊ पंढरीला
विठोबाला हार बुक्का वाहू ||7||
संवादिनी - प्रतिमा सावले.
तबला -श्रीधर घाणेकर.
सहभागी सभासद - रेखा प्रधान, नयना रेडीज, ज्योत्स्ना भगत, शितल महाडिक, मनीषा पवार, आशा भावसार, मीरा मिरकर, अलका रेडकर, उज्वला पाटील, सुलक्षणा बोडस, शिल्पा बेंद्रे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: