शेगावीच्या गजानना रे - संवादिनी व गायन प्रतिमा सावले .तबला व संगीत श्रीधर घाणेकर .
Автор: Pratima Sawle - Muktai Bhajan Mandal
Загружено: 2025-03-04
Просмотров: 660
शेगावीच्या गजानना रे कीर्ती तुझी स्मरते
महंता आज तुला नमिते ||धृ||
तू गुणगुणशील मंत्र सुरावर
वाजवी चुटक्या त्यात अनावर
दुखली बोटे जरी रक्ताळून
मन भजनी रंगते ||1||
भाग्य लाभता तवस्पर्शाचे
दीप उजळले शांती सुखाचे
मरणालाही जीवन देसी
सौख्य मनी फुलते ||2||
भक्तांना तू करीसी पावन
सुखमय होईल अवघे जीवन
चिन्मय निर्मळ सत् स्वरुप तव
नयनी साठविते ||3||
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: