Santosh Deshmukh हत्या प्रकरणात गावकऱ्यांचा मोठा गौप्यस्फोट बाईच्या प्रकरणात अडकवण्याचा होता कट ?
Автор: News Tapu
Загружено: 2025-02-18
Просмотров: 534
#beed #santoshdeshmukh #supriyasulefc #jitendraawhad #bajrangsonwane #massajog #dhananjaydeshmukh #walmikkarad #sureshdhas #sandipkshirsagar #dhananjaymunde #anjalidamania
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आता जवळपास सत्तर दिवसाचा कालावधी होत आला आहे. या प्रकरणावरून बीडमध्ये रोज काही ना काही घडताना आपण पाहतो आहोत. त्यातच आज खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज मसाजोग येथे भेट दिली. या भेटीमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेत, या प्रकरणांमध्ये पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सुप्रिया सुळे यांना संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी घडलेल्या प्रकाराबद्दल काही गोष्टी सांगितल्या, यावेळेस उपस्थित असणाऱ्या गावकऱ्यांनी देखील आपापल्या पद्धतीने सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांना घडलेली घटना आणि काही पार्श्वभूमी सांगितली. या दरम्यान संतोष देशमुख यांच्या आईने दिवंगत संतोष देशमुख यांच्या आठवणी सांगितल्याने काही काळ भावनिक वातावरण निर्माण झालं होतं. त्यावेळी सर्वांनाच अश्रू आश्वानावर झाले. यावेळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी देखील केज तालुक्यात आणि एकूणच बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीची गुंडगिरी आणि बेकायदा कामे चालू आहेत ती परिस्थिती कशामुळे निर्माण झाली, याबद्दलची काही परिस्थिती सुळे यांच्या कानावर घातली. दरम्यान आरोपींच्या नावावर असलेले गुन्हे पाहता हे सराईत गुन्हेगार होते, आरोपींवर असणारे एकूण गुन्हे गंभीर स्वरूपाचे असल्याचे देखील देशमुख यांनी सुळे यांच्या कानावर घातले. संतोष देशमुख हे सरपंच म्हणून आणि त्यांच्या कुटुंबाची गावामध्ये असणारी ओळख आणि त्या माध्यमातून याबद्दलही बऱ्याच गोष्टीची चर्चा करण्यात आली. या प्रकरणामध्ये सुरू असलेला तपास तसंच अद्याप पर्यंत फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे चा शोध, आणि सुरुवातीला तपासामध्ये झालेल्या चुका यादेखील सुप्रिया सुळे आणि आव्हाड यांच्या कानावर घालण्यात आल्या. या प्रकरणामधल्या तपासा संदर्भात प्रश्न उपस्थित करत ठराविक कालावधीमध्ये तपास न झाल्यास अन्नत्याग आंदोलन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येईल अशी देखील माहिती धनंजय देशमुख यांनी दिली. याच भेटीदरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न प्रयत्न होता अशी माहिती गावकऱ्यांनी सुळे यांच्या कानावर घातली. त्यासाठी एक महिला देखील तयार करण्यात आली होती आणि तिच्या माध्यमातून या प्रकरणाला अनैतिक संबंधाचे वळण देण्याचा प्रयत्न करण्यात येणार होता का असेही प्रश्न उपस्थित होत आहेत.
Connect with us:
Facebook: / newstapu
Twitter: / newstapu
Instagram: / newstapu
Website: https://newstapu.com/
Subscribe our channel to get latest news & updates : / @newstapu
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: