Santosh Deshmukh Case Update: कोर्टात 23 व्हिडिओ सादर, 7 तास युक्तिवाद आणि Walmik Karadचा जामीन रद्द
Автор: BolBhidu
Загружено: 2025-12-13
Просмотров: 45826
#BolBhidu #WalmikKarad #BeedNews
संतोष देशमुख यांच्या पत्नी भावुक होऊन कोर्टरुममधून बाहेर आल्या, त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांना अश्रूंचा बांध आवरत नव्हता, कारण होतं कोर्टात सुनावणी दरम्यान दाखवलेले व्हिडीओ. 9 डिसेंबरला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झालं. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. मंत्री धनंजय मुंडेंचा जवळचा सहकारी वाल्मीक कराड या सगळ्या हत्याकांडाचा मास्टर माइंड असल्याचं समोर आल्यावर मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप झाले. त्यानंतर 31 डिसेंबला कराडला अटक झाली. तेव्हापासून तो जेलमध्येच आहे. पोलिसांनी त्याच्यावर मोक्का सुद्धा लावला. पण देशमुखांच्या हत्या प्रकरणात आपल्याला जामीन मिळावा यासाठी कराडने मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. शुक्रवारी या याचिकेवर तब्बल 7 तास सुनावणी पार पडली.
कराडच्या वकिलांनी त्याची अटक बेकायदेशीर असल्याचं म्हणत जामीन देण्याची मागणी केली. पण सरकारी वकिलांनी हे सगळे दावे फेटाळत वाल्मीकच्या विरोधातले पुरावे कोर्टात सादर केले. यात सर्वात महत्त्वाचे पुरावे होते देशमुखांची हत्या करताना आरोपींनी काढलेले व्हिडिओ. सरकारी वकिलांनी कोर्टात तब्बल 23 व्हिडिओ क्लिप्स दाखवल्या. याचवेळी संतोष देशमुखांचे कुटुंबीय भावुक झाले. ही सुनावणी 7 तास चालली आणि सरकारी वकिलांनी कराडच या सगळ्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा युक्तिवाद केला. त्यामुळं आता कराडचा बाहेर येण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाल्याचं बोललं जातंय. पण शुक्रवारी कोर्टातल्या सुनावणीदरम्यान नक्की घडलं काय ? कराडच्या वकिलांनी कोणते दावे केले ? सरकारी वकिलांनी दाखवलेले 23 व्हिडिओ या सगळ्यात कसे महत्त्वाचे ठरू शकतात ? आता कराडचे बाहेर येण्याचे दरवाजे बंद झाले असं का म्हटलं जातंय ? सगळी माहिती जाणून घेऊया या व्हिडिओतून..
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: