मुंबई-गोवा हायवेवर चंद्रापेक्षा जास्त खर्च? गडकरींनी दिली नवी डेडलाईन | Mumbai Goa Highway Update
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-04
Просмотров: 5564
मुंबई-गोवा महामार्गाचे काम एप्रिल 2026 पूर्वी पूर्ण होईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिली. खासदार अरविंद सावंत यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरींनी ही नवी तारीख जाहीर केली. सावंत यांनी 'चंद्रावर जेवढा खर्च झाला नाही, त्यापेक्षा जास्त खर्च या रस्त्यावर झाला' असा टोला लगावला होता. गडकरींनी मान्य केले की या प्रकल्पाला खूप विलंब झाला असून, आतापर्यंत 89 टक्के काम पूर्ण झाले आहे. भूसंपादन आणि कंत्राटदारांच्या अडचणींमुळे हा विलंब झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
#MumbaiGoaHighway #NitinGadkari #ArvindSawant #LokSabha2025 #Konkan #NH66 #MaharashtraNews #SaamTV #Infrastructure #RoadSafety #HighwayUpdate #ShivSenaUBT #WinterSession #MarathiNews #India
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: