Chaudhry Aslam Real Story: Dhurandhar चा Jinn, Lyari Town शांत करणाऱ्या, Chaudhry Aslam चा इतिहास
Автор: BolBhidu
Загружено: 2025-12-11
Просмотров: 49813
#BolBhidu #ChaudhryAslam #Dhurandhar
घराचा दरवाजा उध्वस्त झाला होता, हॉल काही फूट खचलेला, दगड, माती, सिमेंट, लाकूड सगळा ढिगारा साठलेला, बाजूलाच आग लागली होती. घाबरलेली लोकं त्या ढिगाऱ्याकडे घाबरुन बघत होती, ढिगाऱ्याखाली किती मृतदेह असतील याचा अंदाज लावणं सुरु होतं आणि अशातच हालचाल जाणवली. हा ढिगाऱ्या बाजूला सरकवून एक माणूस बाहेर पडला, अंगावर पांढरा कुर्ता, पायात पांढरी सलवार. त्यानं अंगावरची धूळ झटकली, एक सिगरेट पेटवून बोटाच्या बेचकीत धरली, दुसऱ्या हातात कायम असणारी ग्लॉक झटकली आणि म्हणाला, 'इन्होने शेर के मूह मे हात डाला है, इनकी नस्ले भी याद रखेंगी, इसी जगह गाड दूंगा इन्हे.' स्फोट एवढा मोठा होता की, घराच्या बाहेरुन जाणारी दोन माणसं मेली होती, एकूण मृत्यूंचा आकडा आठ होता, याची बायको आणि मुली थोडक्यात वाचल्या होती, हा बेचकीत सिगरेट धरुन, सगळा पंजा तोंडापाशी आणून झुरका घेतल्यानंतर धूर सोडताना सांगत होता, इनकी नस्ले भी याद रखेंगी. हा माणूस कुणालाच भिला नाही, गॅंगस्टर्सला भिडला, तालिबानला भिडला, राजकारण्यांना भिडला, ९ वेळा अटॅक झाले ९ वेळा वाचला, जिवंतपणी दंतकथा बनला, सिंध पोलिसांचा सुलतान राही एसएससपी चौधरी अस्लम. ही स्टोरी त्याच्या ग्लॉकमधून गोळी सुटायच्या आधीपासून ते त्याच्या गाडीला स्फोटकांनी भरलेली गाडी धडकेपर्यंतची.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: