Shah-Shinde Meeting नंतर Bharat Gogawale यांना Raigad च्या पालकमंत्रीपदाबाबत कॉन्फिडन्स का वाटतोय ?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-04-14
Просмотров: 19175
#BolBhidu #BharatGogawale #Raigad
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी रायगडावरील कार्यक्रमाला हजेरी लावली. हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीचा असला तरी सगळ्यात जास्त चर्चा झाली ती रायगडच्या पालकमंत्री पदाच्या वादाचीच. त्यात अमित शहांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतल्यानं तटकरे आपल्या मुलीच्या पालकमंत्रीपदासाठी डिनर डिप्लोमसी करत असल्याचंच बोललं गेलं. आता राज्यातील सगळ्याच नेत्यांनी या चर्चेचं खंडन केलं. त्यामुळं या चर्चा थंड होतील असं वाटत असतानाच त्या थांबण्याऐवजी त्याला आणखी बळ मिळालं. त्याला कारणीभूत ठरल्या त्या शहा आणि शिंदेंच्या बैठकीत झालेल्या चर्चा. त्यानंतर भरत गोगावले यांनाही मुंबईतून तातडीचं बोलवणं आल्याच्याही बातम्या माध्यमांमध्ये आल्या.
या सगळ्या घडामोडी इतक्या वेगात घडल्यानं आता रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटणार या चर्चांना आणखी बळ मिळालं. त्यात भरत गोगावलेंनी केलेल्या विधानामुळं हे पद आता गोगावलेंच्या पारड्यात पडणार असल्याचं बोललं जातंय. गेल्या काही दिवसांपासून गोगावले हे मीच रायगडचा पालकमंत्री होणार असं विश्वासानं सांगत असल्याचं दिसून येतंय. आताही त्यांनी केलेल्या विधानामुळं दोनदा डावलूनही गोगावलेंना पालकमंत्री पदाबाबत एवढा कॉन्फिडन्स का आहे, पालकमंत्रीपदाबाबत त्यांनी केलेलं विधान नक्की आहे काय, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: