Gunratna Sadavarte यांच्या गाडीवर हल्ला,मराठा आरक्षणाला विरोध करणारे सदावर्ते नक्की आहेत तरी कोण ?
Автор: BolBhidu
Загружено: 2023-10-25
Просмотров: 161342
#BolBhidu #MarathaReservation #GunratnaSadavarte
मराठा आरक्षणावरून राज्यातील मराठा समाज चांगलाच आक्रमक झालाय याचच उदाहहण धाराशिवमध्ये पाहायला मिळालं. मराठा आंदोलकांनी सातत्याने मराठा आरक्षणाला विरोध करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पुतळ्याचे दहन केलंय याशिवाय सदावर्ते यांच्या पुतळ्याला जोडेदेखील मारले आहेत. याआधी अंतरवली सराटी येथे झालेल्या भव्य सभेत मनोज जरांगे पाटलांनी गुणरत्न सदावर्ते हे देवेंद्र फडणवीस यांचे पिल्लू आहेत, फडणवीसांनी त्यांना समज द्यावी असा थेट इशारा दिला होता. दुसरीकडे गुणरत्न सदावर्तेंनीसुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं होतं नंतर ते आरक्षण गेलं.
पॉलिटिकल बॉसेससाठी जगणारी ही माणसं, शरद पवार हे मनोज जरांगे पाटील यांचे पॉलिटिकल बॉस आहेत अशा शब्दांत पलटवार केला. एकूणच मराठा आरक्षणाचा मुद्दा निघाला की गुणरत्न सदावर्ते हे नाव चर्चेत येतच. विषय मराठा आरक्षणाचा असो की राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा गुणरत्न सदावर्ते हे नाव सातत्याने चर्चेत असतं. पण महाराष्ट्रातील बातम्यांचा मथळा ठरणारे गुणरत्न सदावर्ते नक्की आहेत कोण ? आजपर्यंत कोणकोणत्या प्रकरणात त्यांच नाव चर्चेत आल आणि त्यांनी महत्वाच्या कोणत्या केसेस लढवल्या आहेत. पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून..
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: