3I Atlas Comet: 3I ॲटलसच्या आधी आलेले Oumuamua, Borisov 2 Interstellar Object नंतर गायब कुठं झाले?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-11-23
Просмотров: 57982
#BolBhidu #3IAtlas #Oumuamua
एलियन येणारेत एलियन, ऐकून ऐकून कंटाळलो, ज्यांची होणार नाहीत वाटलं त्यांची लग्न झाली, ज्यांची नक्की होतील वाटलं, त्यांचं फिस्कटलं, आपल्या डोक्यावरचे निम्मे केस गेले, पण एलियन काय आले नाहीत. पण आपल्या मनात इच्छा फार, कधी कधी वाटतं आपलीच इच्छा मोठी असल्यानं एलियनच्या बातम्या येत असाव्यात. आताही आलीये, म्हणजे तसे येऊन बरेच दिवस झालेत, 3 आय अॅटलस. आपल्या सूर्यमालेत बाहेरून आलेलं एक इंटरस्टेलर ऑब्जेक्ट. कोणी याला धूमकेतू म्हणतंय तर कोणी एलियन शीप. धमुकेतू असला तर धडकणार, त्यात फिक्स भारताबाहेर कुठंतरी समुद्रात पडणार, मग त्याच्या काय बातम्या नाय, चर्चा नाय, भारतातल्या नेत्यांची प्रतिक्रिया नाय. पण एलियन आले तर कसं खळबळ होणार, त्याचं कनेक्शन शोधायचं, भाषा बघायची असं लय काय काय करता येणार. आता आपल्याला मस वाटतंय, ३ आय ऍटलसमध्ये एलियन असतील, पण आपल्या वाटण्यावर काय होत नसतंय.
३ आय अॅटलसचा शोध यावर्षी जुलै महिन्यात लागला. तेव्हापासून त्याच्यावर अनेक जण लक्ष ठेवून आहेत, आम्ही धरून अनेक जण.तर २९ ऑक्टोबरला हा ऑब्जेक्ट सूर्याजवळून गेला. डिसेंबर महिन्यात तो पृथ्वीजवळून पास होणार आहे. ३ आय अॅटलस नावातल्या थ्री चा अर्थ होतो, तिसरा. वा काय माहिती दिली, असं म्हणून मापं काढू नका. याचा नीट अर्थ म्हणजे हा आपल्या सूर्यमालेत बाहेरून आलेला अशाप्रकारचा तिसरा ऑब्जेक्ट आहे. म्हणून ३ आय ऍटलस. आता येत असलेल्या ऑब्जेक्टची एवढी चर्चा होत असेल, तर ऑलरेडी आलेले पहिले दोन ऑब्जेक्ट कसे असतील ? ते कुठून आले ? ते नेमके होते काय ? आलेच असतील एलियन तर ठेवलेत कुठे ? असे अनेक प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरं देणाऱ्या थेअरीज सुद्धा आहेत. दोन्ही सांगतो, निवांत बघा, डेटा संपला तरी लोड नाही, एलियन आल्यावर दुसरा टाइमपास मिळेलच.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: