Sangram Jagtap यांनी अचानक Hindutvavadi स्टॅंड घेण्यामागचं राजकारण काय ? दादांना सोडत BJP प्रवेश ?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-10-13
Просмотров: 151032
#BolBhidu #SangramJagtap #Hindutva
संग्राम जगताप, नितेश राणे, महेश लांडगे या तीन नेत्यामध्ये कॉमन गोष्टी काय आहेत. हे तीनही नेते कट्टर हिंदूत्ववादी नेते म्हणून समोर आलेत. हे तीनही नेते मराठा समाजातून येतात. या तीनही नेत्यांच वय 50 च्या आत आहे. यातल्या महेश लांडगेची राजकीय सुरवात कॉंग्रेसच्या एनएसआईयू या विद्यार्थी संघटनेतून. त्यानंतर राष्ट्रवादी व त्यानंतर भाजप. नितेश राणेंची सुरवात शिवसेना त्यानंतर कॉंग्रेस. कॉंग्रेसमधून भाजप. तर संग्राम जगताप आजही अजित पवारांच्या राष्ट्रवादीत, पण भाजपच्या उंबरठ्यावर… तीनही नेत्यांचा बेस पुरोगामी राजकारण करणाऱ्या पक्षांचा. याच्या राजकारणाची सुरवात कट्टर हिंदूत्व म्हणून झाली नाहीच. पण एकप्रकारे हिंदूत्वाला विरोध करत पुरोगामी राजकारण करणाऱ्या विचारांमधूनच याच राजकारण सुरू झालं. राणे कोकणात सक्रिय, लांडगे पुणे परिसरात पुणे ग्रामीणमध्ये सक्रिय तर संग्राम जगताप नगरमध्ये सक्रिय.
कधीकाळी कॉंग्रेस-राष्ट्रवादी बलवान असणाऱ्या या भागातून येणारे हे नेते. जे आज हिंदूत्ववादी नेते म्हणून आपली ओळख निर्माण करतायत, किंवा त्यांनी तशी आपली इमेज तयार करण्यात यश मिळवलय. आज चर्चा होतेय ती संग्राम जगतापांची. पक्षाच्या विचारसरणी विरोधात भूमिका घेतल्याने अजित पवारांनी संग्राम जगतापांना नोटीस पाठवणार असल्याचं सांगितलं, त्यानंतरही संग्राम जगताप आपल्या भूमिकेवर ठाम राहणार अस त्यांच्या विधानांमधूनच दिसू लागलं. अर्थात एक प्रश्न पडतो तो म्हणजे मागच्या निवडणूकीत तर संग्राम जगताप पुरोगामी होते, 2019 साली देखील ते पुरोगामी होते, 2014 साली देखील ते पुरोगामीच होते. अगदी इतिहास काढायचा झाला तर जगताप कुटूंबाने अहिल्यानगरच्या मुस्लीम समाजासोबत कायम जवळीकच ठेवली? मग अस अचानक काय घडलं की संग्राम जगताप कट्टर हिंदूत्ववादी नेते म्हणून पुढे येवू लागले? मुळात सुरवातील बोललो त्या नितेश राणे व महेश लांडगे यांच्यासोबत तुलना करायचं कारण म्हणजे? या नेत्यांच अस आक्रमकपणे हिंदूत्तवाी नेता म्हणून समोर येणं हे महाराष्ट्राच्या राजकारण ठरवून केल्या जाणाऱ्या स्ट्रॅटेजीचा भाग आहे का? समजून घेऊयात या व्हिडिओतून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO..
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: